Marathi News

“आधी येईल त्याला फ्लॅट मिळेल”…पुण्यातील तळेगाव दाभाडेत 269 घरासांठी म्हाडाची अनोखी योजना

Written by:Rohit Shinde
Published:
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून घरांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अत्यल्प उत्पन्न गट योजनेतील एकूण 269 रिक्त सदनिकांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
“आधी येईल त्याला फ्लॅट मिळेल”…पुण्यातील तळेगाव दाभाडेत 269 घरासांठी म्हाडाची अनोखी योजना

म्हाडाचे घर मिळविण्याचे स्वप्न हे आजही महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक मोठे ध्येय आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यांसारख्या शहरांमध्ये घरांच्या वाढत्या किमतींमुळे म्हाडाची घरे ही परवडणारी आणि विश्वासार्ह संधी मानली जाते. पुण्यात घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी म्हाडा योजना म्हणजे आर्थिक स्थैर्य आणि स्वतःच्या घराचा आनंद मिळविण्याचा मार्ग आहे. पुण्याच्या तळेगाव दाभाडे परिसरातील 269 घरासांठी म्हाडा आता आणखी एक अनोख योजना घेऊन आली आहे.

269 सदनिका विक्रीसाठी; प्रक्रिया काय?

एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाकडून घरांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही घरे नेमक्या कोणत्या प्रवर्गातील आहेत, कुठे आहेत, त्यांची किंमत किती आहे आणि अर्ज कसा करायचा? जाणून घेऊ…

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून तळेगाव दाभाडे, ता. मावळ जिल्हा पुणे येथील प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 762 अत्यल्प उत्पन्न गट योजनेतील एकूण 269 रिक्त सदनिकांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्यही घरे जशी आहेत तशी आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर वितरण करण्यासाठी 10 ऑक्टोबर 2025 पासून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जाहिरातीबाबत सविस्तर…

269 घरांपैकी अनुकूचित जातींसाठी 29, अनुसुचित जमातीसाठी 29, भटक्या जमातीसाठी 5, विमुक्त जातीसाठी 6, सर्वसाधारण प्रवर्गासाठी 200 घरे उपलब्ध आहेत.

लॉटरीच्या संदर्भातील अधिक माहिती

  • योजनेचे ठिकाण – स. क्र. 12 (भाग) तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जिल्हा पुणे
  • रिक्त सदनिका – 269
  • या घरांचे क्षेत्रफळ – 48.96 चौ. मीटर
  • चटई क्षेत्रफळ – 30.67 चौ. मी.
  • अर्जाची किंमत – 600 रुपये + 108 रुपये जीएसटी
  • अर्जासोबत भरावयाची रक्कम – 179688 रुपये

अर्ज विक्रीचे वेळापत्रक

10 ऑक्टोबर 2025 पासून ते 31 डिसेंबर 2025 रोजी पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस वगळून.

अर्ज विक्रीचे ठिकाण – पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ, गृह निर्माण भवन, आगरकर रोड, पुणे

कोणत्या अटींची पूर्तता करावी लागणार?

अर्जदार भारताचा नागरिक असावा .अर्जदारांच्या कुटुंबाचे (पती, पत्नी आणि अज्ञान मुले) यांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा जास्त नसावे. अर्जदारांच्या कुटुंबाचे (पती, पत्नी आणि अज्ञान मुले) यांचे नावे भारतात कुठेही पक्के घर नसावे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या घटक तीनमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. इतर अटी शर्ती अर्जासोबत जोडलेल्या माहिती पुस्तिकेत नमुद केलेल्या आहेत. त्यामुळे इच्छुकांना या अटींची पूर्तता करावी लागणार आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews