Marathi News

पुण्यातील अतिक्रमण व उत्खनन प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे मंत्री बावनकुळेंचे आदेश, अधिकाऱ्यांना घेतले फैलावर…

Written by:Astha Sutar
Published:
कार्यवाही करण्यात अधिकाऱ्यांनी चालढकल करु नये. या ठिकाणी अवैध उत्खनन करणाऱ्यांवर देखील तीन दिवसात गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे आदेशही मंत्री बावनकुळे यांनी दिले.
पुण्यातील अतिक्रमण व उत्खनन प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे मंत्री बावनकुळेंचे आदेश, अधिकाऱ्यांना घेतले फैलावर…

Chandrashekhar Bawankule : महसूल विभागातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील येवलेवाडी, कात्रज, कोंढवा येथील अनधिकृत प्लॉटींग करुन विकणे. आणि अवैध उत्खनन केल्या प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. तसेच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी अधिकारी यांनाही फैलावर घेतले.

बेकायदेशीर अतिक्रमणास संबंधित अधिकारी जबाबदार…

दरम्यान, पुण्यातील येवलेवाडी, कात्रज, कोंढवा येथील अतिक्रमण तसेच उत्खनन केल्या प्रकरणी आणि बेकायदेशीर अतिक्रमित प्लॉटींग केल्याबाबत जे दोषी असतील त्यांच्यावर तर कारवाई होईलच. पण त्या संबंधित विभागातील महानगरपालिका आयुक्त, अधिकारी, तहसिलदार यांना जबाबदार धरण्यात येईल. त्यामुळे पुढील तीन दिवसात कारवाई करुन याबाबतचा अहवाल सादर करण्यात यावा, असे निर्देश मंत्री बावनकुळे यांनी दिले.

कार्यवाही करण्यात चालढकल नको…

पुढे बोलताना महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, अतिक्रमण करणाऱ्यांना केवळ नोटीस देऊन चालणार नाही. दंड भरुन घेतला म्हणजे सर्व काही झाले असे नाही. त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे लागतील. तसेच कात्रज, कोंढवा, येवलेवाडी येथील अनधिकृत अतिक्रमणे काढण्यात आली, पण ती पूर्णपणे काढण्यात आली नाहीत. विधान परिषदेत आश्वासन दिल्यानंतर त्याची कार्यवाही करण्यात अधिकाऱ्यांनी चालढकल करु नये. या ठिकाणी अवैध उत्खनन करणाऱ्यांवर देखील तीन दिवसात गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे आदेशही मंत्री बावनकुळे यांनी दिले.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews