Mumbai Municipal Corporation Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीदरम्यान मुंबईत भारतीय जनता पार्टीने आपल्या कार्यकर्त्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी पक्षाविरोधी कारवाई केल्याचं कारण सांगत २६ कार्यकर्त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. या २६ कार्यकर्त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे.
उमेदवारांना सहकार्य न केल्याने पक्षातून बेदखल…
अमित साटम यांनी जारी केलेल्या नोटीसनुसार, वारंवार सांगितल्यानंतरही मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये महायुतीचे उमेदवारांसह सहकार्य न केल्याने या कार्यकर्त्यांना पार्टीतून निलंबित करण्यात आलं आहे. ८ जानेवारी रोजी याबाबत नोटीस देण्यात आली होती.
नोटीसमध्ये २६ कार्यकर्त्यांची नावं देण्यात आली होती, ती पुढीलप्रमाणे…
1. आसावरी पाटील
2. मुक्ता महेश पटेल
3. सुचित्रा नाईक
4. जयमुरगन नाडार
5. दिवेश यादव
6. अयोध्या पाठक
7. सुचित्रा संदिप जाधव
8. कॅ. राकेश कोहेलो
9. दिव्या ढोले
10. उर्मिला गुप्ता
11. सुषमा देशमुख
12. स्नेहाली वाडेकर
13. प्रिया प्रविण मरगज
14. प्रविण मरगज
15. संगिता खुटवड
16. प्रशांत ठाकूर
17. धनश्री अजय बागल
18. विनित सिंह
19. सरबतजित सिंग संधू
20. अमित शेलार
21. शोभा साळगावकर
22. मोहन आंबेकर
23. सुशिल सिंह
24. नेहल शहा
25. सिध्देश कोयंडे
26. जान्हवी राणे
काँग्रेसमधूनही १२ नगरसेवकांचं निलंबन…
सध्या राज्यभरात अंबरनाथ नगरपरिषद चर्चेत आहे. येथे शिवसेना शिंदे गटाला बाहेर ठेवण्यासाठी भाजपने थेट काँग्रेससोबत युती केल्याचं समोर आलं होतं. यानंतर एकच राजकीय खळबळ उडाली होती. यानंतर काँग्रेसने कारवाई करीत त्या १२ नगरसेवकांचं निलंबन केलं होतं. त्यानंतर या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपसोबत युती केल्यामुळे काँग्रेसने नगरसेवकांवर कारवाई केली. तर दुसरीकडे नगरसेवकांनी थेट भाजपचा हात धरल्याचं समोर आलं आहे.





