Marathi News

Mumbai Nanded Special Train : मुंबई- नांदेड विशेष रेल्वेसेवा सुरू; या 16 स्थानकांवर थांबणार

Published:
मुंबई आणि नांदेड दरम्यान धावणारी आहे या एक्सप्रेस ट्रेन मुळे मराठवाड्यातील प्रवाशांचा प्रवास अगदी आरामदायी होणार आहे. तसेच या रेल्वेचा नाशिककरांनाही विशेष लाभ मिळणार आहे
Mumbai Nanded Special Train : मुंबई- नांदेड विशेष रेल्वेसेवा सुरू; या 16 स्थानकांवर थांबणार

आजपासून नवरात्रीला सुरुवात झाली असून मुंबई- पुण्यासारख्या शहरात नोकरीला असलेला चाकरमानी हा दुर्गदेवीनिमित्त मूळ गावी जात असतो . साहजिकच प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतुकीवरचा ताण वाढतो. अशावेळी प्रवाशांना आरामदायी आणि सुखद प्रवासाचा अनुभव देण्यासाठी रेल्वे विभागाने अनेक ठिकाणी स्पेशल गाड्या सुरू केल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्पेशल ट्रेन बाबत सांगणार आहोत जी मुंबईहून थेट मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यापर्यंत धावली जाईल (Mumbai Nanded Special Train) …. मुंबई आणि नांदेड दरम्यान धावणारी आहे या एक्सप्रेस ट्रेन मुळे मराठवाड्यातील प्रवाशांचा प्रवास अगदी आरामदायी होणार आहे. तसेच या रेल्वेचा नाशिककरांनाही विशेष लाभ मिळणार आहे . आज आपण या ट्रेनची वेळापत्रक आणि ती कोण कोणत्या स्थानकावर थांबेल याबाबतची माहिती जाणून घेऊया.

कसे आहे ट्रेनचे वेळापत्रक? Mumbai Nanded Special Train

तर मित्रांनो ,आम्ही तुम्हाला ज्या रेल्वे बाबत सांगत आहोत ती  विशेष ट्रेन मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते हुजूर साहेब नांदेड दरम्यान विशेष रेल्वेगाड्या धावणार आहे. मुंबई आणि नांदेडला जोडणारी ही ट्रेन (Mumbai Nanded Special Train) क्रमांक 07603 ही रेल्वे 22 ते 29 सप्टेंबर या कालावधीत दर सोमवारी हुजूर साहेब नांदेड येथून रात्री 23:45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 13:40 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. तर ट्रेन क्रमांक 07604 ही रेल्वे 23 ते 30 सप्टेंबर या कालावधीत दर मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी 16:35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 06:30 वाजता हुजूर साहेब नांदेड येथे पोहोचेल.

कोणकोणत्या स्थानकांवर थांबणार?

ही विशेष ट्रेन (Mumbai Nanded Special Train) ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, नागरसोल, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी आणि पूर्णा या रेल्वे स्थानकांवर थांबेल. या स्पेशल ट्रेनमध्ये 1 प्रथम श्रेणी वातानुकूलित, 2 द्वितीय श्रेणी वातानुकूलित, 6 तृतीय श्रेणी वातानुकूलित, 6 शयनयान आणि 4 सामान्य द्वितीय श्रेणी डबे असतील. यामुळे सर्व प्रकारच्या प्रवाशांना आरामदायी प्रवास करण्याचा आनंद घेता येईल.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews