शहरात पाणीपुरवठा बंद राहिल्यास नागरिकांना मोठा मनस्ताप होतो. दैनंदिन जीवनावर त्याचा थेट परिणाम होतो, अशा परिस्थितीत नागरपुरकरांची डोकेदुखी वाढविणारी बातमी समोर येत आहे. नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर यांच्याकडून बुधवार, 15 ऑक्टोबर रोजी शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूर शहरातील पाणीपुरवठा बाधित होणार आहे.
बुधवारी शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
पारडी फीडर मेनवरील दुरुस्तीच्या कामासाठी नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर यांच्याकडून बुधवार, 15 ऑक्टोबर रोजी शटडाऊन घेण्यात येणार आहे. सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत 12 तासांचा हा शटडाऊन असणार आहे. या काळात 400 मिमी व्यासाच्या मिनीमाता ईएसआर इनलेट व्हॉल्व्ह बदलण्याचे काम करण्यात येईल. त्यामुळे पारडी आणि भांडेवाडी परिसरातील अनेक वस्त्यांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेने नागरिकांना पुरेसे पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन केले आहे.
या भागातील पाणीपुरवठा होणार बाधित
सुभाननगर जलकुंभ अंतर्गत येणाऱ्या साईनगर, नेताजीनगर, म्हाडा कॉलनी, विजयनगर, निवृत्तीनगर, भारतनगर, लक्ष्मीनगर, गुलमोहरनगर, भगतनगर, महादेवनगर, भारतवाडा, दुर्गानगर, गुजराती कॉलनी, चंद्रानगर, जुनी पारडी, एचबी टाऊन, आभा कॉलनी, शिक्षक कॉलनी, ओमनगर, तलमलेनगर या वस्तीमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे.






