5,000 हजार कोटींचा नवा प्रकल्प; पुण्यातील वाहतूक कोंडीची कटकट कायमची मिटणार?

Written by:Rohit Shinde
Published:
पुण्यात लवकरच एक 5,000 कोटींचा रस्ते प्रकल्प केला जाण्याची शक्यता आहे. आता हा प्रकल्प खरंच सुरू झाला तर पुण्यातील वाहतूक कोंडीची कटकट कायमची मिटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
5,000 हजार कोटींचा नवा प्रकल्प; पुण्यातील वाहतूक कोंडीची कटकट कायमची मिटणार?

पुणे: पुण्यातील वाहतूक कोंडी ही एक गंभीर समस्या बनली आहे. शहरातील वेगाने वाढणारी लोकसंख्या, वाहने आणि अपुरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यामुळे रस्त्यांवर प्रचंड गर्दी होते. अनेक मुख्य रस्त्यांवर आणि चौकांमध्ये दररोज वाहतूक कोंडी पाहायला मिळते. अपुरी पार्किंग व्यवस्था, बेशिस्त वाहनचालक, रस्त्यांची दुरवस्था आणि अपूर्ण मेट्रो प्रकल्प यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. वेळ वाया जातो, इंधनाचा अपव्यय होतो आणि प्रदूषणात वाढ होते. नागरिकांना याचा रोज त्रास सहन करावा लागतो. आता आगामी काळात होऊ घातलेल्या एका प्रकल्पामुळे यावर कायमचा तोडगा निघेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

5,000 कोटी खर्च, प्रश्न सुटणार?

या प्रकल्पात खासगी आणि सरकारी क्षेत्राचा सहभाग आहे. पुणे मेट्रोच्या विस्तारामुळे उड्डाणपुलाचे संरेखन बदलण्याची गरज भासल्यास MSRDCला सरकारची नव्याने मंजुरी घ्यावी लागेल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पुणे शहरात येणारी आणि बाहेर जाणारी वाहने अधिक सुलभतेने प्रवास करू शकतील. दररोज होणाऱ्या वाहनांच्या गर्दीत मोठ्या प्रमाणात वेळ आणि इंधन वाया जाते. यावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हडपसर ते यवत दरम्यान 25 किलोमीटर लांब उड्डाणपूल बांधण्यास मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 5000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा पूल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वर उभारला जाईल. या उड्डाणपुलामुळे हडपसर, उरळी कांचन, लोणीकंद, यवत आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.

हा उड्डाणपूल प्रकल्प केवळ हडपसर ते यवतपुरताच मर्यादित नसून यवत ते सोलापूर दरम्यान 6.5 किलोमीटरचा मार्गही रुंद केला जाणार आहे. एकूण 5262 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर (BOT) मॉडेलअंतर्गत राबवणार आहे. यानुसार, खासगी भागीदार कंपनी प्रकल्प पूर्ण करेल, काही वर्षे त्याचे संचालन करेल आणि टोल वसुलीद्वारे खर्चाची परतफेड करेल. फास्टटॅग आणि GPS प्रणालीद्वारे टोल वसुली पारदर्शक आणि सुलभ केली जाईल आणि दर तीन वर्षांनी टोल दराचा आढावा घेतला जाईल.

पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर

पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे, पण रस्त्यांची क्षमता मर्यादित आहे. सकाळी आणि संध्याकाळी ऑफिसच्या वेळात मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर कोंडी होते. अपुरी सार्वजनिक वाहतूक, बेशिस्त वाहनचालक, चुकीची पार्किंग आणि अपुऱ्या रस्त्यांची दुरवस्था या सर्व गोष्टींमुळे समस्या अधिकच वाढली आहे. यामुळे नागरिकांचा वेळ वाया जातो, इंधन खर्च वाढतो आणि मानसिक तणाव देखील वाढतो. प्रदूषणातही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या समस्येवर उपाय म्हणून सार्वजनिक वाहतूक सुधारणे, ट्रॅफिक व्यवस्थापन सक्षम करणे आणि नागरी शिस्तीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. अन्यथा ही समस्या अधिक बिकट होईल.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews