लोकल ट्रेनला स्वयंचलित दरवाजे बसविण्याचा निर्णयाविरोधात प्रवासी संघटना आक्रमक, राजकीय नेत्यांचाही विरोध

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
मुंबईत लाखो प्रवासी रोज लोकल ट्रेनने प्रवास करतात. तुडुंब मुंबईकरांची गर्दी असते आणि आतमध्ये लोकांना त्रास होईल. गुदमरण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वयंचलित दरवाजे मुंबईत चालणार नाहीत, असे प्रवासी संघटनेने म्हटले आहे.
लोकल ट्रेनला स्वयंचलित दरवाजे बसविण्याचा निर्णयाविरोधात प्रवासी संघटना आक्रमक, राजकीय नेत्यांचाही विरोध

Mumbai local train accident – मुंबई लोकल ट्रेन ही मुंबईकरांची जीवनवाहिनी समजली जाते. मुंबईकराची लाईफ लाईन समजली जाते. परंतु हीच लाईफ लाईन आज मुंबईकरांसाठी डेथ लाईन ठरली आहे. आज सकाळी साडे नऊच्या दरम्यान दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान दोन ट्रेनमधील फुट बोर्डवर उभा असलेले प्रवासी एकमेकाला धडकले. आणि त्यातून 13 प्रवासी खाली पडले रेल्वेतून खाली पडले. यात चौघांचा मृत्यू झाला आहे तर आठ जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल निला यांनी दिली आहे.

स्वयंचलित दरवाजाचा निर्णय…

दरम्यान, मुंबईतील लोकल ट्रेनमधील या दुर्घटनेनंतर रेल्वे बोर्डाने एसी आणि नॉन एसी ट्रेनमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल नीला यांनी दिली आहे. परंतु स्वयंचलित दरवाजाला विरोध होताना दिसत आहे. मुंबईत लाखो प्रवासी रोज लोकल ट्रेनने प्रवास करतात. तुडुंब मुंबईकरांची गर्दी असते आणि आतमध्ये लोकांना त्रास होईल. गुदमरण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वयंचलित दरवाजे मुंबईत चालणार नाहीत, असे प्रवासी संघटनेने म्हटले आहे.

परप्रांतीयांचे लोंढे थांबवले पाहिजेत…

दुसरीकडे गर्दी ही मुंबईसाठी नवीन नाही किंवा रेल्वेवरील गर्दी हे काही नवीन नाही. परंतु रेल्वे प्रशासनाने रेल्वेने मुंबईकरांसाठी काय सुविधा दिली? या शहराचा काही टाऊन प्लॅनिंग नाही. मुंबईत परप्रांतीयांचे एवढे लोंढे वाढलेले आहेत की त्याचा ताण रेल्वेवरती येत आहे. त्यामुळे हे पहिले रप्रांतीयांचे लोंढे थांबवले पाहिजेत. पूर्ण शहराचा विचका झाला आहे. आणि जी गर्दी आहे त्याच्यावरती तोडगा काढला पाहिजे, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनावरती केली आहे.

अजून किती जीव जाण्याची वाट पाहणार…

मुंबईच्या या गर्दीवर लोकल फेऱ्या अधिक वाढवण्याची आपण यापूर्वी मागणी केली आहे. दिवा टू सीएसएमटी लोकल ट्रेन सुरू करा. कित्येक वेळा सांगितले आहे. कारण दिव्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे. परंतु यावर कोणताही तोडगा न काढल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. अजून किती जीव जाण्याची रेल्वे वाट बघणार आहे, अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी  रेल्वे प्रशासनावर केली आहे.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews