Marathi News

निवडणुकीच्या तोंडावर हिंदीवरुन राजकारण सुरु, मंत्री उदय सामंतांची ठाकरे गटावर टीका

Written by:Astha Sutar
Published:
राज ठाकरेंचा हेतू हा मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषेसाठी आहे. पण दुसरीकडे ७ जुलैला जो मोर्चा काढणार आहे, ते केवळ राजकारणासाठी आहे आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काढला जाणारा आहे, असा निशाणा उदय सामंतांनी उद्धव ठाकरेंवर साधला. 
निवडणुकीच्या तोंडावर हिंदीवरुन राजकारण सुरु, मंत्री उदय सामंतांची ठाकरे गटावर टीका

Uday Samant – सध्या राज्यात हिंदी भाषेवरून बराच वाद सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्या आरोप प्रत्यारोप आणि टीका होत आहे. दरम्यान, आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी भेट घेतली. यानंतर राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. यानंतर तिसरी भाषा म्हणून म्हणून धोरण कुणामुळे आले, हे पाहिले पाहिजे असं मंत्री उदय सामंत यांनी म्हणत उद्धव ठाकरेंवर टिका केली आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

त्यांची भूमिका का बदलली

आम्हीही कुठेही हिंदी भाषा सक्तीचे आहे असं उल्लेख केलेला नाही. तरीपण याबद्दल संभ्रम निर्माण केला जातो. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित बैठक झालेली आहे आणि साहित्यिक, लेखक, कवी मराठी भाषेची अभ्यासक, तज्ञ जाणकार यांची मतं घेऊन हिंदी भाषा सशक्तीबद्दल निर्णय घेऊ असं म्हटलं आहे. आदित्य ठाकरे यांनी तिसऱ्या भाषेबद्दल त्यांची तेव्हा भूमिका होती तर आता भूमिका का बदलली? की फक्त निवडणुकीच्या तोंडावर त्यांची भूमिका बदलली आहे, अशी टीका उद्या सामंतांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली. आज ते मराठी माणसाबद्दल बोलत आहेत. पण त्यावेळी विरोध केला असता तर आज ही वेळ आली नसती. अशी टिका उदय सामंतांनी ठाकरे गटावर केली.

केवळ राजकारण करताहेत…

दरम्यान, आगामी पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे हिंदी सक्तीचे आणि मराठीवरून राजकारण करताहेत. यांना कोणतेही मराठी आणि मराठी माणसाबद्दल प्रेम नाही. दुसरीकडे आम्हीही हिंदी भाषेचा आग्रह करत नाही. परंतु दोन-तीन वर्षांपूर्वी आदित्य ठाकरे यांनीही मराठी, इंग्रजी आणि तिसऱ्या भाषेचा पर्यायाबदल भूमिका मांडली होती. असं म्हणत सामंत यांनी आदित्य ठाकरेंचा जुना व्हिडिओ पत्रकार परिषदेत दाखवला. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा त्रिभाषीय अहवाल स्वीकारला. या अहवालात मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचा उल्लेख होता. मग जर त्यांचं मराठीवरती एवढे प्रेम होतं, तर त्यांनी हा त्रिभाषिक अहवाल का स्वीकारला? असा सवाल उदय सामंत यांनी उपस्थित करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews