पूर्वीचे स्थगिती सरकार आताचे प्रगती सरकार, एकनाथ शिंदे यांचा उबाठाला टोला

Written by:Astha Sutar
Published:
डॉ. श्रीकांत यांनी खासदारांच्या शिष्टमंडळाचे यशस्वी नेतृत्व केलं आणि परदेशात ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका पटवून दिली. या चारही देशांनी भारताला पाठिंबा दिला आणि पाकिस्तानला विरोध केला. पाकिस्तानचा खरा चेहरा उघडा करण्याचे काम या शिष्टमंडळाने केले.
पूर्वीचे स्थगिती सरकार आताचे प्रगती सरकार, एकनाथ शिंदे यांचा उबाठाला टोला

Eknath Shinde – गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रातील जनतेने पाहिलं आणि अनुभवलं. पूर्वीचे स्थगिती सरकार होते तर महायुतीचे प्रगतीचे आणि समृद्धीचे सरकार आहे, एखाद्याला शब्द दिला तर तो पूर्ण करतो, असा टोला शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठाला लगावला. अहिल्यानगरमधील श्रीरामपूरच्या शेकडो कार्यकर्त्यांनी,  माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील शहपूरमधील सुमारे ७०० कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

महायुतीची दुसरी इनिंग सुरु…

दरम्यान, महायुतीला विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक बहुमत मिळाले. आताही महायुतीची दुसरी इनिंग सुरु आहे, देवेंद्रजी आणि आमची टीम महाराष्ट्राला पुढे नेतेय. या राज्याचा विकास, प्रगती झाली पाहिजे आणि सर्वसामान्य माणूस विकासाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे, या हेतूने सरकार काम करत आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार पुढे घेऊन चाललोय. मुख्यमंत्री असताना राज्यात लाडकी बहिण, लाडका भाऊ, लाडक्या शेतकऱ्यांसाठी व ज्येष्ठांसाठी कल्याणकारी योजना आणल्या. त्यामुळेच जनतेनं आम्हांला निवडून दिले, असं शिंदे म्हणाले.

उच्चशिक्षित पिढी राजकारणात येणं महत्वाचे…

पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, समाजाच्या दृष्टीने उच्चशिक्षित पिढी राजकारणात येणं, ही काळाजी गरज आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शिवसेनेचे युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे देखील नुकताच चार देशांचा दौरा करुन मायदेशी परतले. धनुष्यबाण हाती घेणाऱ्या भानुदास मुरकुटे यांचा नातू नीरज मुरकुटे याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विशेष कौतुक केले. नीरज मुरकुटे हा ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठातून उच्च शिक्षण घेऊन आला आहे. त्याने शिवसेनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews