Rain Alert: महाराष्ट्रात शनिवारी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी

Written by:Rohit Shinde
Last Updated:
महाराष्ट्राच्या काही भागात शनिवारी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि साताऱ्याला तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
Rain Alert: महाराष्ट्रात शनिवारी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी

राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असून काल अनेक भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. पुढील 24 तासांत अनेक भागांमध्ये मुसळधार अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. संपूर्ण राज्यातून नैऋत्य मान्सूनने माघार घेतली असली तरी पोषक हवामान तयार झाल्यामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होत आहे. 18 ऑक्टोबर रोजी देखील सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

राज्याच्या विविध भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होत आहे. 18 ऑक्टोबर रोजी देखील सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात साधारणपणे ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. तर मुंबईत सायंकाळी किंवा रात्री मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. दक्षिण कोकणातील सिंधुदुर्गला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरीमध्ये देखील पावसाची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर सांगली, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहणार असून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्याला हवामान विभागाने पावसासाठी अलर्ट दिलेला नाही. परंतु नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. तर उर्वरित धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आकाश मुख्यतः निरभ्र राहील.

मराठवाडा-विदर्भात तुरळक पावसाचा अंदाज

मराठवाड्यातील बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. तर संपूर्ण विदर्भामध्ये कुठेही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली नाही. विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांमध्ये सामान्यतः स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरडे हवामान पाहायला मिळेल.  21 ऑक्टोबर पर्यंत राज्यात विविध ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता कायम आहे. मराठवाड्यामध्ये 21 ऑक्टोबर रोजी परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews