बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रावरील पावसाचे संकट पुढील 2 ते 3 दिवस कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. पुढील दोन महाराष्ट्रात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या शक्ती चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात रविवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे, विशेष म्हणजे मुंबई आणि कोकण पट्ट्यात यामुळे पाऊस कोसळेल. तर बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे. नागरिकांना या काळात आवश्यक ती सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात पुढील 2-3 दिवस पावसाची शक्यता
देशभरामध्ये सध्या पावसाची काय स्थिती?
बंगालाच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे पुढील चार दिवस देशभरात पावसाचा जोर वाढणारा असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील चार दिवस पाच ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण उत्तर भारतात जोरदार पावसाची शक्यता आहे. वादळ आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे, हा मान्सूनचा या वर्षीचा शेवटचा पाऊस असू शकतो असंही हवामान खात्यानं म्हटलं आहे.
तामिळनाडू, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये या काळात पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. पुढील दोन दिवस महाराष्ट्र राज्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील दोन दिवस संपूर्ण उत्तर भारतात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कता बाळगावी लागणार आहे.






