महाराष्ट्रावरील पावसाचे संकट आणखी गडद; 26 आणि 27 सप्टेंबरला ‘या’ जिल्ह्यांत जोरदार पाऊस बसरणार!

Written by:Rohit Shinde
Published:
महाराष्ट्रावरील पावसाचे संकट आणखी गडद झाले आहे. राज्यातील विविध भागांमध्ये 26 ते 27 सप्टेंबर दरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
महाराष्ट्रावरील पावसाचे संकट आणखी गडद; 26 आणि 27 सप्टेंबरला ‘या’ जिल्ह्यांत जोरदार पाऊस बसरणार!

पावसामुळे राज्यात मोठं नुकसान झालं आहे. शेतकरी संकटात सापडला आहे. नद्यांना आलेल्या पुरामुळे परिस्थिती आणखी बिकट बनली आहे. अशा परिस्थितीत 26 आणि 27 सप्टेंबर रोजी राज्यातील परिस्थिती आणखी गंभीर स्वरूप धारण करू शकते, असा अंदाज आता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

सलग दोन दिवस पाऊस बरसणार!

बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात 26 ते 27 सप्टेंबर दरम्यान ढगाळ हवामान आणि पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच राज्यातून 5 ऑक्टोबरनंतर मान्सून निरोप घेण्याची शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

दक्षिण मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरातील धरण साठ्यात वाढ होऊन नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे. अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी हवामानाच्या या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करावे. काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

विदर्भ-मराठवाड्याला सर्वाधिक धोका

पुढील 24 तासांमध्ये बंगालच्या उपसागरात कमी दबाचा पट्टा निर्माण होणार आहे, त्यामुळे पुढचे पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार 25 सप्टेंबर पासून ते 29 सप्टेंबरपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर येत्या 27 सप्टेंबरला मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे याच काळात विदर्भात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, पुढील पाच दिवस मराठवाडा आणि विदर्भाला पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या पार्श्वभूमीवर मच्छिमार बांधवांना समुद्रात न जाण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.

पावसामुळे राज्यभरात मोठे नुकसान

राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे, पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. मराठवाड्याला तर पावसाचा सर्वात मोठा फटका बसला आहे. उभी पिकं पाण्याखाली गेली असून, शेतकरी हवालदिल झाली आहेत, नद्यांना आलेल्या पुरामुळे तर परिस्थिती आणखी बिकट बनली आहे. पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून, अनेक जण गावातच अडकले आहेत, त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे.पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews