विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई आणि कोकणात या आठवड्यात पाऊस विश्रांती घेणार आहे. तर उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा चांगला जोर राहण्याची शक्यता आहे. राज्यातील 17 जिल्ह्यांना या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, पुढील सात दिवस पाऊस जोरदार हजेरी लावण्याची शक्यात आहे.
17 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार!
हवामान विभागाकडून महाराष्ट्राला 17 सप्टेंबरपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांमध्ये पुढील सात दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ज्यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांसह रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे, या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून महाराष्ट्राला हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आगामी काही दिवसांत विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत मुसळधार अशा पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे तेलंगणा, कर्नाटक सीमाभागातील जिल्ह्यांमध्ये या काळात जोरदार अशा स्वरूपाचा कोसळेल, तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा,सांगली,कोल्हापूर या जिल्ह्यांत देखील चांगल्या स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या काळात नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.
विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
आज दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटा आणि वादळासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी देखील विजांपासून सावध रहावे.
गेल्या महिन्यात जोरदार हजेरी लावल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. आता पुन्हा एकदा पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून तो हळूहळू पश्चिमेकडे सरकत आहे. तसेच, बंगालच्या उपसागराच्या पूर्व-मध्य भागातही पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. यामुळे मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसेल.






