09 नोव्हेंबरपर्यंत राज्यात पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. तर 06 नोव्हेंबरसाठी काही जिल्ह्यांना हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे राज्यातील पाऊस 09 नोव्हेंबर नंतरच पुर्णपणे उघडीप घेईल, अशी शक्यता या निमित्ताने निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल होत आहे. तर दुसरीकडे आता महाराष्ट्रासाठी भारतीय हवामान विभागाने नवीन अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानूसार राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पुढील 03 दिवस पावसाचा जोर राहणार !
भारतीय हवामान विभागाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाल्यामुळे देशाच्या अनेक भागात पाऊस आणि वादळे येऊ शकते. त्यामुळे 09 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्र, उत्तराखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील अनेक भागात पावसाची शक्यता आहे. आज अहिल्यानगर, रत्नागिरी, सांगली, पुणे आणि सातारा या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
तर बीड, नांदेड, सोलापूर, रायगड, मुंबई, धाराशिव आणि कोल्हापूरमध्ये ढगाळ वातावरण असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर कोकण आणि गोवा किनारपट्टी भागात वादळ येण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.
सततच्या पावसाचा शेतीला फटका
नोव्हेंबर महिना उजाडला असूनही पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही. फक्त राज्यातच नाही तर देशभरात पाऊस सुरू आहे. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. यावर्षी मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडला, शेतकर्यांचं मोठं नुकसान झाले. शासनाच्या मदतीची वाट शेतकरी अजूनही बघत आहेत. राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.
9 नोव्हेंबरनंतर पावसाची उघडीप?
नोव्हेंबर महिना उजाडला तरी राज्यात थंडीचा काही नामोनिशाण दिसत नाहीये. येता जात पडणाऱ्या पावसामुळे सामान्य नागरिक हैराण झाले असून मोठा त्रास सहन करावा लागत आहे. राज्यात थंडीची चाहूल सहा नोव्हेंबरनंतरच लागेल . अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही ठिकाणी 9 नोव्हेंबरपर्यंत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 8 ते 9 नोव्हेंबरनंतर हवामान कोरडे होऊन थंडीची चाहूल लागण्याचा अंदाज हवामाना तज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे राज्यातील पाऊस खऱ्या अर्थाने 09 नोव्हेंबरनंतरच उघडीप घेईल, अशी शक्यता निर्माण झालेली आहे.






