Marathi News

दोन दिवसांत मंत्री संजय शिरसाटांचा राजीनामा घ्या, रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, अन्यथा…

Written by:Astha Sutar
Last Updated:
पाच हजार कोटी रुपयांची फाइल सहजपण फिरत असेल, तर याला भ्रष्टाचार म्हणू शकतो. आमचे ट्रकभर, गाडीभर नाहीत, पण बॅगभर पुरावे आहेत, एवढेच फडणवीसांना सांगायचे आहे. बारा हजार पानांचे हे पुरावे आहेत.
दोन दिवसांत मंत्री संजय शिरसाटांचा राजीनामा घ्या, रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, अन्यथा…

Rohit Pawar : नवी मुंबईतील बिवलकर कुटुंबियांना बेकायदेशीर जमीन देत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी नुकताच केला होता. आता या प्रकरणातील बॅग भरुन ठोस पुरावे असूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत मंत्री संजय शिरसाट यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. पुरावे हाती असल्याशिवाय बोलत नाही आणि या प्रकरणी तब्बल १२ हजार पानांचे पुरावे आणल्याचा दावा त्यांनी केला आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

गणपती सणापर्यंत शांत राहू…

दरम्यान, या सर्व प्रकरणाची शहानिशा होईपर्यंत ६१ हजार स्वेअर मीटरचा भूखंड हा ताबडतोब थांबवावा. ८ हजार स्वेअर मीटरचा भूखंड एका प्रायव्हेट व्यक्तीला दिलेला आहे. तो सुद्धा परत मागून घ्यावा. संजय शिरसाट यांचा दोन दिवसांत राजीनामा घ्यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. गणपती होईपर्यंत आम्ही शांत राहू, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला. जर तुम्हाला पैशाची गरज लागली, तर शासनाकडे या. शासनाचे पैसे संपले, तर माझी बॅग उघडी आहे, असे  म्हणणाऱ्या भ्रष्ट्र माणसाला पदावर ठेवू नका. पुरावे आम्ही दिलेले आहेत, असं पवार म्हणाले.

१२ हजार पाने पुरावे…

बिवलकर कुटुंबांचा १९९३ चा अर्ज, सिडकोने फेटाळलेले आधीचे चार अर्ज, विधी व न्याय विभागाचा अहवाल, नगर विकास विभागाने १ मार्च २०२४ ला सिडकोला दिलेले पत्र, सिडकोचा ठराव आणि सिडकोचे सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र असे पुरावे माध्यमांसमोर दाखवले. बिवलकर कुटुंबाचा साडेबारा टक्क्यासाठी अर्ज २८ जुलै १९९३ आला होता. या अर्जात त्यांनी सांगितले की, आम्ही चुकीचे ठरलो, तर आम्ही पूर्ण जमीन सिडकोला देणार आहोत. तांत्रिकदृष्ट्या पाहिल्यास बिवलकर कुटुंब चुकीचेच ठरलेले आहेत. असे रोहित पवार म्हणाले. १८ एप्रिल १९९४ रोजी पहिल्यांदा अर्ज फेटाळला. या प्रकरणी तब्बल १२ हजार पानांचे पुरावे आणल्याचा दावा पवारांनी केला.

पुढे काय करणार आहात?

सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरू असताना बिवलकर यांना जमीन कशी काय दिली? असा सवाल रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. हे कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन आहे असे वाटत नाही का? जी ५ हजार कोटी रुपयांची जमीन दिली ती जमीन बिवलकर यांनी बिल्डरांना विकली. आता ही जमीन अडचणीत येणार आहे. त्या लोकांचे पुढे काय करणार आहात? ही जमीन तुम्ही माघारी घेणार का? असे प्रश्नही रोहित पवारांनी उपस्थित केले. आमच्याकडे असलेला पेनड्राइव्ह पण तुमच्यापर्यंत देतो. तुम्ही हे पुरावे पाहणार आहात का? असा सवाल करत, याबाबत फडणवीस काय करतात हे आम्हाला सगळ्यांना बघायचे आहे.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews