Marathi News

मुंबईत लालबागच्या राजाची राजेशाही मिरवणूक सुरू; गणेशभक्तांची मोठी गर्दी, पोलीस यंत्रणा अलर्ट

Written by:Rohit Shinde
Published:
मुंबईतील नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला खरंतर काही वेळापूर्वी सुरूवात झाली आहे. भक्तांची मोठी गर्दी यावेळी पाहायला मिळत आहे.
मुंबईत लालबागच्या राजाची राजेशाही मिरवणूक सुरू; गणेशभक्तांची मोठी गर्दी, पोलीस यंत्रणा अलर्ट

आज राज्यभरात गणेश विसर्जनाची लगबग सुरू आहे. मुंबईतील मानाचा आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणूकीला खरंतर सुरूवात झाली आहे. महाराष्ट्राच्या महाउत्सवाची म्हणजेच गणेशोत्सवाची आज सांगता होत आहे. आज अनंत चतुर्थीच्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. गेली दहा दिवस गणेशभक्तांनी मनोभावे पूजलेल्या गणेश मूर्तींना आज विसर्जित करण्यात येणार आहेत.

लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक

आपल्या लाडक्या बाप्पांचे भावपूर्ण निरोप देताना गणेशभक्तांचा उत्साह आणि जल्लोष असतोच पण त्या सोबत “पुढच्या वर्षी लवकर या…” अशी प्रेमळ साद ही असते. मुंबईत गणेश विसर्जन सोहळ्याला पावसाची हजेरी लागणार आहे. कालपासून मुंबईत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. आज पहाटेपासूनही पाऊस सुरु आहे.त्यामुळे आज गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी जोरदार पाऊस बरसेल, असा अंदाज आहे. अशातच मुंबईतील लालबाग परिसरातील लालबागच्या राज्याच्या विसर्जनाच्या शाही मिरवणुकीला सुरुवात झाली असून लालबागचा राजा मुख्यप्रवेश द्वाराजवळ आला आहे. भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

मुंबईत गणपती विसर्जनाचा आज भव्य सोहळा पार पडत आहे. पोलिसांनी प्रथमच AI तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षा व्यवस्था मजबूत केली आहे. लालबागचा राजा, गणेश गल्ली, आणि इतर प्रमुख गणपतींचे विसर्जन वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या आहेत. खरंतर गणेश भक्तांनी देखील मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

 10 दिवस सेवा केल्यानंतर आज लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना आज निरोप देण्यात येणार आहे. हा दिवस लहान मुलांसोबत मोठ्यांसाठी देखील भावूक करणारा असतो. बाप्पाची सेवा केल्यानंतर आज थाटामाटात बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या या नाम घोषात बाप्पाला आज निरोप दिला जाईल. गणपती विसर्जनासाठी मुंबई, पुण्यासह राज्यभर यंत्रणा सज्ज झालेली पाहायला मिळत आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews