“मोदी, योगींचे नाव घेण्यासाठी टॉर्चर केले”…मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोेष सुटकेनंतर साध्वी प्रज्ञासिंह ठाकुरांचे धक्कादायक दावे

Written by:Rohit Shinde
Published:
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील निर्दोष सुटकेनंतर आता साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी अनेक धक्कादायके दावे केले आहेत. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.
“मोदी, योगींचे नाव घेण्यासाठी टॉर्चर केले”…मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोेष सुटकेनंतर साध्वी प्रज्ञासिंह ठाकुरांचे धक्कादायक दावे

2008 मध्ये मालेगाव बॉम्ब स्फोटाचा अलीकडेच मुंबई विशेष न्यायालयाने निकाल दिला आहे. यामध्ये कोर्टाने या प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह ठाकुरांसह सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले. मोटार सायकलमध्ये स्फोट झाल्याचेही सिद्ध झाले नाही, स्फोट झाल्याचे सिद्ध होत नाही, असे म्हणत कोर्टाने सातही आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर, कर्नल पुरोहित, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी अशी या सात आरोपींची नावे आहेत. त्यामुळे तपास यंत्रणेला हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यानंतर आता साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी अनेक धक्कादायके दावे केले आहेत.

प्रज्ञासिंह ठाकुरांचा काय दावा?

न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रज्ञा ठाकूर यांनी चौकशीदरम्यान आपल्या वागणुकीबाबत धक्कादायक आरोप केला. त्यांनी दावा केला की, तपास यंत्रणांनी त्यांच्यावर अमानुष अत्याचार केला आणि बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवले. त्यावेळी त्या म्हणाल्या की, “माझ्यावर नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, मोहन भागवत, सुरेश (सुदर्शन), इंद्रेश कुमार आणि राम माधव यांची नावे घेण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली,” असं त्यांनी म्हटलं. “त्यांनी मला सांगितलं की, मी जर या लोकांची नावं घेतली, तर मला त्रास दिला जाणार नाही. त्यांचा हेतू मला मानसिकरित्या खचवण्याचा आणि खोटे कबूल करून घेण्याचा होता. पण मी कोणाचंही नाव घेतलं नाही.”

NIA न्यायालयाचा हा निकाल भारतातील सर्वाधिक वादग्रस्त दहशतवादी खटल्यांपैकी एका प्रकरणावर कायदेशीर टोक आणतो. मात्र, ठाकूर यांच्या नव्या आरोपांमुळे या प्रकरणातील सुरुवातीच्या तपासाच्या पद्धतीबाबत पुन्हा एकदा चर्चा आणि चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रज्ञासिंह ठाकुरांच्या या धकाकादायक दाव्यांमुळे एकच खळबळ माजली आहे.

मालेगावात त्यावेळी नेमकं काय घडले?

२००८ मालेगाव बॉम्बस्फोट ही भारताच्या इतिहासातील एक गंभीर आणि वादग्रस्त घटना होती. २९ सप्टेंबर २००८ रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात एक स्फोट झाला. या स्फोटात ६ लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे १०० लोक जखमी झाले. स्फोट एक मोटरसायकलमध्ये लपवलेल्या बॉम्बमुळे झाला होता.

सुरुवातीला यामागे इस्लामी दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय होता, परंतु तपास पुढे गेला तसं हिंदू अतिरेक्यांचा सहभाग समोर आला. तपास यंत्रणांनी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित, आणि इतर काही लोकांना अटक केली. हे प्रकरण भारतात ‘हिंदू अतिरेकी गटां’च्या संकल्पनेवर प्रकाश टाकणारे ठरले. या प्रकरणाची चौकशी एटीएस (Anti-Terrorism Squad) आणि नंतर NIA (National Investigation Agency) यांनी केली.

या घटनेमुळे देशभरात राजकीय खळबळ उडाली आणि धार्मिक ध्रुवीकरण वाढले. अटक केलेल्या आरोपींवर अनेक वर्षे खटला चालू राहिला. काही आरोपींना जामीनही मिळाला. आजही हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून समाजात या घटनेबाबत तीव्र भावना आहेत. मालेगाव बॉम्बस्फोटाने भारतात दहशतवादाच्या स्वरूपावर आणि तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर मोठा प्रभाव टाकला.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews