Marathi News

Samosa Jalebi History : सामोसा आणि जिलबी मूळचे कोणत्या देशातले? मुस्लीम देशांशी आहे कनेक्शन…

Written by:Smita Gangurde
Last Updated:
जिलबी आणि सामोसा भारतीयांच्या ताटात येण्यामागील रंजक इतिहास आहे. जाणून घेऊया...
Samosa Jalebi History : सामोसा आणि जिलबी मूळचे कोणत्या देशातले? मुस्लीम देशांशी आहे कनेक्शन…

भारतीयांना सामोसा आणि जिलबीचं वेड आहे. हे वेड इथपर्यंत पोहोचलंय की, भारताने जिलबीला राष्ट्रीय मिठाई घोषित केलं आहे. सध्या तर संपूर्ण देशात या दोन पदार्थांची मोठी चर्चा आहे. चर्चेचं कारण म्हणजे आरोग्य मंत्रालयाचा आदेश. मंत्रालयाने सर्व केंद्रीय संस्थानांना सामोसा-जिलबीपासून अलर्ट देणारे फलक लावण्याचे आदेश दिले आहे. ज्याप्रमाणे तंबाखू आणि सिगारेटबाबत इशारा दिला जातो, त्यानुसार नागपुरात आता सामोसा आणि जिलबी नाश्त्यावरूनही इशारा दिला जाणार आहे. नागपुरात अतिरिक्त तेल आणि साखरेचा वापर केलेल्या पदार्थांच्या जवळ अशा प्रकारे इशारा देणारे बोर्ड लावले जाणार आहेत.

मुस्लीम देशातून जिलबी कशी पोहोचली भारतात? (In which country did Jalebi originated)

भारतात जिलबी खाण्याचा इतिहास शेकडो वर्ष जुना आहे. इतिहासात याचं कनेक्शन मुस्लीम देशाशी जोडलं जात आहे. खरं पाहता जिलबीची उत्पत्ती पर्शिया देशातून झाली, जो सध्या इराण या नावाने ओळखला जातो. येथूनच या देशात यीस्ट तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. येथूनच यीस्ट हा प्रकार युरोप आणि जगातील इतर देशांपर्यंत पोहोचला.

इराणमध्ये याला जुलबिया नावाची ओळखलं जातं. आज नाश्त्यात याचा वापर केला जात नसला तरी इराणमध्ये विशेषत: रमजानच्या महिन्यात जिलबी उर्फ जुलबिया खाण्याची परंपरा आहे. मध्य पूर्वेतील अनेक देशांमध्ये यात मध आणि गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर केला जातो. ज्यामुळे याचा स्वाद आणि सुगंध द्विगुणीत होतो.

भारतात जिलबी अनेक नावांनी ओळखली जाते. उत्तर भारतात याला जलेभी आणि दक्षिणेत याला जिलबी किंवा जेलेबी म्हणून ओळखली जाते. तर उत्तर पूर्वेकडे याला जिलापी म्हटलं जातं. प्राचीन फारशीच्या स्वयंपाकासंबंधित पुस्तकांमध्ये अल-तबीखमध्ये लेखक मोहम्मद बिन हसन अल-बगदादी लिहितात, पर्शियाची जुलबियाचा उल्लेख दहाव्या शतकाच्या सुरुवातीच्या कागदपत्रांमध्ये मिळतो. ते पुढे लिहितात, जिलबी रमजानच्या उत्सवातील एक खास व्यंजन आहे. रमजानदरम्यान हा पदार्थ लोकांमध्ये वाटला जातो.

इतिहासकारांच्या अंदाजानुसार, जिलबी फारसी कारागिर, व्यापारी आणि मध्य पूर्वेतील आक्रमकांद्वारे भारतात पोहोचली. भारतात जिलबी तयार करण्याच्या पद्धतीत बदल झाला. १५ व्या शतकापर्यंत भारतातील लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांमध्ये जिलबीचा वापर केला जात होता. हळूहळू ही चव भारतीयांना आवडू लागली आणि आता ती भारतीय व्यंजनांना एक खास भाग झाली आहे.

सामोसा कोणत्या देशातून आणि कसा पोहोचला भारतात? (In which country did Samosa originated)

जिलबीप्रमाणे सामोस्याचा इतिहासही इराणशी संबंधित आहे. इतिहासकारांनुसार, सामोस्याचा सर्वात पहिला उल्लेख फारसी इतिहासकार अबुज फजल बेहकी यांनी केला होता. त्यांनी अकराव्या शतकात आपल्या लेखनात सामोस्याचा उल्लेख केला होता. त्यावेळी याला सामोसा नाही तर संबुश्क नावाने ओळखलं जात होतं.

मात्र त्यावेळी सामोस्याची चव वेगळी होती. सामोस्यात बटाट्याच्या सारणाऐवजी मावा आणि ड्राय फ्रूटचं सारण होतं. याचा आकार त्रिकोण कधी झाला याबाबत नेमकी माहिती नाही. उज्बेकिस्तान आणि अफगणिस्तानहून होत सामोसा भारतात पोहोचला. अफगणिस्तानमध्ये सामोस्यात मांस आणि कांद्याचं सारण भरलं जात होतं. जंगलात जनावरांना चारा खाऊ घालण्यासाठी जाणारे अशा प्रकारे सामोसे स्वत: सोबत घेऊन जात असत. येथून भारतात येणारे लोक हे घेऊन भारतात पोहोचले. भारतात सामोस्यावर अनेक प्रयोग झाले. भारतातही सामोस्यात मावा भरून साखरेच्या पाण्यात घोळवून विकण्याची परंपरा सुरू राहिली, मात्र यामध्ये कधी बटाटा तर कधी पोहे भरून तयार केला जाऊ लागला.

Follow Us :GoogleNews