संकटकाळात न घाबरता कसं उभं राहावं, म्हणून शिंदेंना पुस्तक पाठवलंय, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला

Written by:Astha Sutar
Published:
देवेंद्र फडणवीस हे शरद पवारांचे कौतुक दिल्लीची परवानगी घेऊनच केलं असावं. भाजपाचे सगळे निर्णय हे धोरणात्मक असतात. भाजपाच्या नेत्यावर विश्वास ठेवण्याचं काही कारण नाही. कारण ही लोकं कधीही हल्ला करतील, हे काही सांगता येत नाही.
संकटकाळात न घाबरता कसं उभं राहावं, म्हणून शिंदेंना पुस्तक पाठवलंय, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला

Sanjay Raut – शरद पवार हे देशातील ज्येष्ठ नेते आहेत. जय-पराजयचा विचार न करता ते सातत्याने काम करतात. हे सगळ्यांना मान्य करावेच लागेल. आम्हीही त्यांच्याकडून प्रेरणा घेत असतो. पण त्यांचे हे गुण देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही शरद पवार यांच्याकडून घेतले पाहिजेत, काहीना निवडणुकीत यश-अपयश आले की, थांबत नाहीत. पळून जातात. पण पवार साहेब हे सातत्याने काम करताहेत. उशिरा का असेना, पण देवेंद्र फडणवीसांनी मान्य केले. त्याबद्दल त्यांचे आभार, असा टोला संजय राऊतांनी फडणवीसांना लगावला.

शरद पवार भाजपासोबत जाणार नाहीत…

दरम्यान, जी नवी पिढी भाजपासोबत जाण्यासाठी व्याकुळ झालेली आहे, असं अनेकजण म्हणताहेत. पण तहान सर्वांनाच लागलेली आहे. सगळेच व्याकुळ झालेले आहेत. पण गढूळ पाणी कोणी पिणार नाही, डबक्यात कोणी उडी मारणार नाही, असं राऊत म्हणाले. शरद पवारांची विचारधारा आणि भूमिका मी जेवढी ओळखतो. ते पाहता ते भाजपासोबत जातील असं मला वाटत नाही. कारण भाजपाची विचारधारा, भूमिका वेगळी आहे. आणि जे भाजपासोबत केले त्यांची आज काय अवस्था आहे. असं संजय राऊत म्हणाले.

तुमची नीतीमत्ता कुठे गेली?

2019 रोजी युतीला बहुमत मिळुनही भाजपाने शिवसेनेने धोका दिला. आम्ही शेवटपर्यंत चर्चेची दार उघडी ठेवले होती. परंतु भाजपानेच आम्हाला दगा दिला. सत्तेचं समान वाटप, 50-50 असं अमित शहांनी म्हटलं होतं. मग त्याचा अर्थ काय होतो? त्यावेळी तुम्ही उपमुख्यमंत्रीपद सुद्धा द्यायला तयार नव्हता. हे आमच्या धोरणात बसत नाही, असं भाजपाने म्हटलं होतं. ज्यांनी घोटाळे केले म्हणून, भ्रष्टाचार केला म्हणून तुम्ही त्यांना तुरुंगात टाकले होते. त्याच लोकांसोबत आज तुम्ही सत्तेत आहात. मग त्यावेळी तुमची नीतिमत्ता कुठे गेली? असा सवला संजय राऊतांनी उपस्थित केला.

एकनाथ शिंदेंनी पुस्तकातून शिकावे…

दरम्यान, ‘नरकातला स्वर्ग’ मी हे पुस्तक राज ठाकरे यांना पाठवलंय. एकनाथ शिंदेंनाही पाठवलं आहे. हे पुस्तक त्यांनी वाचावे आणि संकटकाळात न घाबरता कसं पायावर उभं राहायचं… कसं लढायचं… यातून त्यांनी प्रेरणा घ्यावी, असं म्हणून त्यांना पुस्तक पाठवलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हे पुस्तक पाठवलेय. जरी हे बाल साहित्य असले तरी हे प्रौढ साहित्य आहे. तसेच जे जे ईडीला घाबरून, भाजपकडे गेले. त्या सर्वांना मी हे पुस्तक पाठवलं आहे. असं संजय राऊत म्हणाले.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews