Sindhudurg Tourist Drowned : सिंधुदुर्गात 8 पर्यटक समुद्रात बुडाले; बचावकार्य सुरू

Published:
बुडालेले सर्व पर्यटक स्थानिक पर्यटक होते. समुद्रात अंघोळीसाठी उतरले असताना अचानक मोठी लाट आली. पर्यटकांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि या लाटेतच आठ जण वाहून गेले
Sindhudurg Tourist Drowned : सिंधुदुर्गात 8 पर्यटक समुद्रात बुडाले; बचावकार्य सुरू

सिंधुदुर्गातून एक मोठी अपडेट समोर येत आहे. सिंधुदुर्गातील शिरोडा वेळागर बीचवर आठ पर्यटक बुडाल्याची धक्कादायक घटना (Sindhudurg Tourist Drowned) घडली आहे. आज सायंकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच तातडीनं बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली. एकूण 8 पैकी  तीन जणांचे मृतदेह सापडले असून पाच जणांच्या मृतदेहाचा शोध अजून सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे तसेच कोकणच्या पर्यटनावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत.

पाण्याचा अंदाज आला नाही – Sindhudurg Tourist Drowned

मिळालेल्या माहितीनुसार, बुडालेले सर्व पर्यटक स्थानिक पर्यटक होते. समुद्रात अंघोळीसाठी उतरले असताना अचानक मोठी लाट आली. पर्यटकांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि या लाटेतच आठ जण वाहून गेले.  या घटनेनंतर मृतांच्या कुटुंबीयांनी समुद्रकिनारीच मोठा आक्रोश केला. Sindhudurg Tourist Drowned

बचावकार्य सुरू –

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक आणि स्थानिक प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली. घटनेची माहिती मिळताच तातडीनं बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली. NDRF आणि SDRF ची पथके तैनात करण्यात आली. बचाव कार्य सुरू असताना तीन पर्यटकांचे मृतदेह आढळून आले आहेत, तर तीन पर्यटकांना वाचवण्यात यश आलं आहे. अजून काही पर्यटकांना शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे..Sindhudurg Tourist Drowned

सिंधुदुर्ग चे जिल्हाधिकारी सुरजितसिंह राठी यांनी म्हटलं की पर्यटकांना समुद्रात स्नान करण्यापासून सतर्क करण्यात आलं होतं. परंतु तरीही दुर्दैवी घटना घडली. शोध मोहीम 24 तास सुरूच ठेवण्यात येईल. सध्या या दुर्घटनेमुळे शिरोडा वेळागर बीच तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. तसेच स्थानिक मच्छीमारांनी या शोध मोहिमेत मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews