Marathi News

Sinhagad Ghat Road Closed : महाराष्ट्रातील हा घाट प्रवासासाठी बंद; वाहनचालकांनो बातमी वाचाच

Published:
पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धा २०२६ त्या पार्श्वभूमीवर घाट रस्त्यामध्ये डांबरीकरणाचे काम सुरू झाले असल्याकारणाने हा रस्ता प्रवासासाठी बंद करण्यात आला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र धुडी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
Sinhagad Ghat Road Closed : महाराष्ट्रातील हा घाट प्रवासासाठी बंद; वाहनचालकांनो बातमी वाचाच

Sinhagad Ghat Road Closed : पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आजपासून पुढील दोन-तीन दिवस सिंहगड घाट रस्ता बंद करण्यात आलेला आहे.  पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धा २०२६ त्या पार्श्वभूमीवर घाट रस्त्यामध्ये डांबरीकरणाचे काम सुरू झाले असल्याकारणाने हा रस्ता प्रवासासाठी बंद करण्यात आला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र धुडी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

कधीपर्यंत बंद राहणार घाट (Sinhagad Ghat Road Closed)

सिंहगड घाट रस्ता 24 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या 3 दिवसांच्या दरम्यान प्रवाशांसाठी बंद असेल. म्हणजेच आज मध्यरात्रीपासूनच याची अंमलबजावणी सुरू होईल. कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या अहवालानंतर याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे. Sinhagad Ghat Road Closed

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर गोळेवाडी चौक ते सिंहगड घाट (कोंढणपूर बाजू) हा संपूर्ण मार्ग बंद राहणार आहे. तसेच या काळात सिंहगड किल्ल्याकडे जाणारी पर्यटकांची वाहतूक सुद्धा पूर्णतः बंद ठेवली जाणार आहे. तसेच  पानशेत, खानापूर, डोणजे आणि आतकरवाडी येथून सिंहगड घाटमार्गे खेड-शिवापूरकडे जाणारी वाहतूकही बंद राहील. यामुळे या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना इतर पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी आणि प्रवाशांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

पर्यायी व्यवस्था कशी असेल

सिंहगड घाटातील वाहतूक पूर्णतः बंद राहणार असल्याने सर्वसामान्यांना पानशेत डोणजे चौक → खडकवासला → किरकटवाडी → नांदेड सिटी → वडगाव धायरी मार्गे खेड शिवापूर असा प्रवास करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews