Marathi News

सौर ऊर्जेमुळं शेतकऱ्यांना अखंडित वीज मिळणार, राज्य सरकारचा नवीन सौर ऊर्जा प्रकल्प काय आहे?

Written by:Astha Sutar
Published:
सुमारे १३,८८० मेगावॅट क्षमतेसह भारतातील सर्वात मोठ्या राज्य-नियंत्रित विद्युत उत्पादकांपैकी एक आहे. दुसरीकडे महानिर्मिती ही कंपनी नवीकरणीय ऊर्जेचे प्रकल्प सुरू करत आहे.
सौर ऊर्जेमुळं शेतकऱ्यांना अखंडित वीज मिळणार, राज्य सरकारचा नवीन सौर ऊर्जा प्रकल्प काय आहे?

Solar energy : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. सौर ऊर्जेबाबत सरकारने आता पुढाकार घेतला आहे. राज्यात शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी महानिर्मितीतर्फे १,०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प होणार आहे. हा प्रकल्प मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प २.० अंतर्गत लवकरच कार्यान्वित होणार आहे. या सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे, अशी माहिती  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

प्रकल्पामुळं पारंपरिक ऊर्जेवरील भार कमी होणार

दुसरीकडे या सौर ऊर्जा प्रकल्पामुळं कृषी ग्राहकांना कमी दरात अधिक वीज वापरण्यास मिळणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० आहे. २०२५ पर्यंत सुमारे ३०% फीडरचे सोलरायझेशनचे उद्दिष्ट ‘मिशन २०२५’ निश्चित केले आहे. जीईएपीपी इंडिया ही कंपनी द रॉकफेलर फाउंडेशन इकीया फांउडेशन व बेझॉज अर्थ फंड यांच्या सहकार्याने स्थापन झालेली आहे. या प्रकल्पामुळं पारंपरिक ऊर्जेवरील भार कमी होणार आहे. तर कार्बन उत्सर्जन घटवून शेतक-यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा मिळणार आहे. या निर्णयामुळं शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.

जीईपीपीच्या मदतीने प्रकल्प

दरम्यान, सुमारे १३,८८० मेगावॅट क्षमतेसह भारतातील सर्वात मोठ्या राज्य-नियंत्रित विद्युत उत्पादकांपैकी एक आहे. दुसरीकडे महानिर्मिती ही कंपनी नवीकरणीय ऊर्जेचे प्रकल्प सुरू करत आहे, ज्यामुळे वीज ग्राहकांना कमी दरात मिळणार असल्याचे बोलले जाते. जीईपीपी इंडिया हा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रकल्प मॉनिटरिंग युनिट (PMU) सुविधा आणि एक डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करत आहे. महानिर्मिती (महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी लि.) सूत्रधारी कंपनी मर्यादित या कंपनीची संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे. पण सरकारच्या या प्रकल्पामुळं शेतकऱ्यांना रात्रभर वीज मिळणार आहे.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews