सोयाबीन बाजारात सध्या दरांमध्ये मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. नव्या हंगामातील आवक वाढत असताना काही बाजार समित्यांमध्ये दर वाढताना दिसत आहेत, तर काही ठिकाणी घसरण नोंदवली जात आहे. मात्र एकुणच राज्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या दरामध्ये चांगली सुधारणा पाहायला मिळत आहे. आज बुधवार, 24 डिसेंबर रोजी राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये दराची नेमकी काय स्थिती राहिली, कुठे आवक किती झाली ? या बाबी सविस्तर जाणून घेऊ.
राज्यभरात सोयाबीनच्या दरात सुधारणा
महाराष्ट्रात काही बाजारांत दर्जेदार सोयाबीनला चांगला दर मिळत असला तरी सर्वसाधारणपणे दर स्थिरावल्याचे चित्र आहे. 23 आणि 24 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या व्यवहारांनुसार सोयाबीनचे दर किमान 2,500 रुपयांपासून ते कमाल 6,000 रुपयांपर्यंत नोंदवले गेले आहेत.
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची मोठी आवक झाली. अमरावती बाजार समितीत लोकल सोयाबीनची तब्बल 5,790 क्विंटल आवक झाली असून येथे किमान 4,250 तर कमाल 4,500 रुपये दर मिळाला. लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीनची 8,180 क्विंटल इतकी मोठी आवक नोंदवली गेली असून येथे सरासरी दर 4,900 रुपये इतका राहिला. जालना बाजारातही 6,130 क्विंटल आवक झाली असून कमाल दर 5,000 रु नोंदवला गेला.
मराठवाड्यात परळी-वैजनाथ बाजारात 1,304 क्विंटल आवक झाली असून येथे सोयाबीनला 4,550 ते 4,741 रुपये दर मिळाला. माजलगाव, नांदेड, औसा आणि कळंब (धाराशिव) आणि अहमपूर या बाजारांतही मोठ्या प्रमाणावर व्यवहार झाले. औसा बाजारात सरासरी 4,627 रुपये तर कळंब बाजारात 4,651 रु. सरासरी दर नोंदवण्यात आला. उत्तर महाराष्ट्रात लासलगाव-विंचूर, सिन्नर, पिंपळगाव (ब) आणि मनमाड या बाजारांमध्येही व्यवहार झाले. लासलगाव-विंचूर येथे 537 क्विंटल आवक असून सरासरी दर 4,711 रुपये राहिला. पिंपळगाव (ब) – पालखेड येथे हायब्रीड सोयाबीनला कमाल 4,780 रुपये तर सरासरी 4,730 रुपये दर मिळाला.






