Special Trains To Pandharpur : कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला विशेष रेल्वेगाड्या; पहा कुठून कुठे धावणार?

Published:
मध्य रेल्वेने याबद्दल प्रसिद्धीपत्रक जारी केले असून यामध्ये विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. पंढरपूर येथे भरणाऱ्या कार्तिकी वारीला येणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवास सुलभ करण्यासाठी ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत मिरज-लातूर आणि सोलापूर-मिरज दरम्यान विशेष गाड्यांची सेवा देण्यात येणार असल्याचे या प्रसिद्धीपत्रकाच्या निवेदनात म्हटले आहे.
Special Trains To Pandharpur : कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला विशेष रेल्वेगाड्या; पहा कुठून कुठे धावणार?

येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा पार पडणार आहे. कार्तिकी वारीच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त पंढरपूरच्या दिशेने जातात साहजिकच या मार्गावरील रेल्वे गाड्यांवर (Special Train To Pandharpur) ताण वाढतो अशा वेळी वारकऱ्यांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा यासाठी मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. कार्तिकी वारी निमित्त मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे गाड्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

३६ विशेष रेल्वे चालवल्या जाणार (Special Trains To Pandharpur)

मध्य रेल्वेने याबद्दल प्रसिद्धीपत्रक जारी केले असून यामध्ये विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. पंढरपूर येथे भरणाऱ्या कार्तिकी वारीला येणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवास सुलभ करण्यासाठी ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत मिरज-लातूर आणि सोलापूर-मिरज दरम्यान विशेष गाड्यांची सेवा देण्यात येणार असल्याचे या प्रसिद्धीपत्रकाच्या निवेदनात म्हटले आहे. तसेच ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२५ दरम्यान एकूण ३६ विशेष रेल्वे फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.

लातूर मिरज विशेष ट्रेन

गाडी क्रमांक ०१४४३ मिरज-लातूर अनारक्षित विशेष गाडी ३० ऑक्टोबर २०२५ ते ०४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत दररोज सकाळी ७:०० वाजता मिरजहून निघेल आणि त्याच दिवशी दुपारी ३:३० वाजता लातूरला पोहोचेल.

-गाडी क्रमांक ०१४४४ लातूर-मिरज अनारक्षित विशेष गाडी ३० ऑक्टोबर २०२५ ते ०४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत दररोज सायंकाळी ४:०० वाजता लातूरहून निघेल आणि त्याच दिवशी रात्री ११:४५ वाजता मिरजला पोहोचेल.

-गाडी क्रमांक ०१४४२ लातूर-मिरज अनारक्षित विशेष गाडी ३० ऑक्टोबर २०२५ ते ०४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत दररोज सकाळी ६:०० वाजता लातूरहून निघेल आणि त्याच दिवशी दुपारी १:५० वाजता मिरजला पोहोचेल.

-गाडी क्रमांक ०१४४१ मिरज-लातूर अनारक्षित विशेष गाडी ३० ऑक्टोबर २०२५ ते ०४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दररोज १०:०० वाजता मिरजहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटो ५:३० वाजता लातूरला पोहोचेल.

मिरज ते लातूर दरम्यान वरील सर्व रेल्वे आरग, सलगरे, कवठेमहांकाळ, धालगाव, जाठ रोड, म्हसोबा डोंगरगाव, सांगोला, पंढरपूर, मोडलिंब, कुर्डुवाडी, शेंद्री, बार्सी टाऊन, पांगरी, धाराशिव, येडशी, कळंब रोड, ढोकी, मुरुड, औसा रोड आणि हरंगुळ या रेल्वे स्थानकावर थांबेल.

सोलापूर मिरज ट्रेन

गाडी क्रमांक ०१४१९ सोलापूर-मिरज अनारक्षित विशेष गाडी ३० ऑक्टोबर २०२५ ते ०४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत दररोज सकाळी ७:०० वाजता सोलापूरहून निघेल आणि त्याच दिवशी दुपारी १२:१० वाजता मिरजला पोहोचेल. (Special Trains To Pandharpur)

-गाडी क्रमांक ०१४२० मिरज-सोलापूर अनारक्षित विशेष गाडी ३० ऑक्टोबर २०२५ ते ०४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत दररोज दुपारी १२:५० वाजता मिरजहून निघेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ७:०० वाजता सोलापूरला पोहोचेल.

सोलापूर ते मिरज दरम्यान वरील दोन रेल्वे मोहोळ, माढा, कुईवाडी, मोडलिंब, पंढरपूर, सांगोला, म्हसोबा डोंगरगाव, जठ रोड, धालगाव, कवठेमहांकाळ, सलगरे आणि आरग या स्थानकावर थांबतील.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews