Marathi News

ST Mahamandal: दिवाळीत एसटी महामंडळ मालामाल; प्रवाशांच्या सेवेतून 301 कोटींचे उत्पन्न मिळाले!

Written by:Rohit Shinde
Published:
दिवाळीत एसटी तब्बल 301 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाने 20 कोटी 47 लाख रुपये इतके मिळवले असून त्यानंतर धुळे विभागाला 15.60 कोटी आणि नाशिक विभागाला 15.41कोटी उत्पन्न मिळाले.
ST Mahamandal: दिवाळीत एसटी महामंडळ मालामाल; प्रवाशांच्या सेवेतून 301 कोटींचे उत्पन्न मिळाले!

यंदा दिवाळीत एसटी महामंडळ मालामाल झाले आहे. कारण प्रवाशांच्या सेवेतून एसटीला समाधानकारक उत्पन्न मिळाल्याची माहिती समोर येत आहे. दिवाळी हा सण आनंद, भेटीगाठी आणि प्रवासाचा असतो. या काळात एसटी महामंडळाच्या बससेवेला मोठा प्रतिसाद मिळतो. गावाकडे जाणारे प्रवासी, नातेवाईकांना भेट देणारे आणि पर्यटनासाठी जाणारे नागरिक यामुळे प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढते. या वाढत्या गर्दीला तोंड देण्यासाठी एसटी प्रशासनाकडून अतिरिक्त बसेस सोडल्या जातात आणि प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था केली जाते.

तिकीट आरक्षण, वेळापत्रक आणि सुरक्षा यावर विशेष भर दिला जातो. प्रत्येक प्रवाशाचा सुरक्षित आणि सुखद प्रवास सुनिश्चित करण्यासाठी चालक आणि कर्मचाऱ्यांना विशेष सूचना दिल्या जातात. त्यामुळे दिवाळीत एसटीचा प्रवास हा सुरक्षित, सोयीस्कर आणि आनंददायी ठरतो. अशा परिस्थितीत एसटीच्या उत्पन्नात देखील या काळात मोठी वाढ होत असते.

दिवाळीत एसटीला 301 कोटींचे उत्पन्न

महाराष्ट्रात सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात नागरिक एसटीने प्रवास करत असतात. त्यात या दिवाळीच्या सुट्टीत नागरिकांन एसटीने मोठ्या प्रमाणात प्रवास केला आहे आणि त्याचाच फायदा एसटी मंहामंडळाला झाला जो की त्यांच्या उत्पन्नात भरगोस वाढ झाली आहे. एसटी तब्बल 301 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाने 20 कोटी 47 लाख रुपये इतके मिळवले असून त्यानंतर धुळे विभागाला 15.60 कोटी आणि नाशिक विभागाला 15.41कोटी उत्पन्न मिळाले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी संबंधित विभागांतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

18 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर या दहा दिवसांच्या दिवाळी कालावधीत दररोज सरासरी 30 कोटी रुपयांचे उत्पन्न एसटी महामंडळाने मिळवले आहे. विशेष म्हणजे, 27 ऑक्टोबर या परतीच्या दिवशी एसटीला तब्बल 39 कोटी 75 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून हा या वर्षातील सर्वाधिक विक्रमी दिवस ठरला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा महामंडळाने 37 कोटी रुपयांनी जास्त उत्पन्न मिळवले असल्याचे समोर आले आहे.

दिवाळीत पुणे विभागाला सर्वाधिक उत्पन्न

दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) पुणे विभागातील स्वारगेट, वाकडेवाडी (शिवाजीनगर) आणि वल्लभनगर (पिंपरी-चिंचवड) या स्थानकांमधून 589 अतिरिक्त फेऱ्या राबवल्या. त्यामुळे 15 ते 18 ऑक्टोबर या चार दिवसांत एकूण सहा हजार फेऱ्या पूर्ण झाल्या. अडीच लाखाहून अधिक प्रवाशांनी या कालावधीत बससेवा वापरली. विशेषत: वाकडेवाडी बस स्थानकावरून नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, अहिल्यानगर, लातूर, धाराशिव आणि परभणीसाठी 900 फेऱ्यांची वाढ करण्यात आली.

दिवाळी सणानिमित्त दरवाढ न करता अतिरिक्त 589 गाड्या राबवल्याने प्रवाशांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. विशेषत: खासगी वाहतूक करणाऱ्यांकडून अतिरिक्त दर आकारण्यात आल्याने प्रवाशांनी ‘एसटी’ला प्राधान्य दिले आहे. तिकीट आरक्षण, वेळापत्रक आणि सुरक्षा यावर विशेष भर दिला जातो. प्रत्येक प्रवाशाचा सुरक्षित आणि सुखद प्रवास सुनिश्चित करण्यासाठी चालक आणि कर्मचाऱ्यांना विशेष सूचना दिल्या जातात. त्यामुळे दिवाळीत एसटीचा प्रवास हा सुरक्षित, सोयीस्कर आणि आनंददायी ठरतो.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews