Sanjay Raut – पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार त्रिभाषा सूत्राला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याबाबत दोन्ही जीआर रद्द केले आहेत. दरम्यान, त्रिभाषेचा दोन जीआर सरकारने रद्द केल्यानंतर आता यावर प्रतिक्रिया येताहेत.
हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द!
हा मराठी एकजुटीचा विजय,
ठाकरे एकत्र येणार याचा धसका,
५ जुलैचा एकत्रीत मोर्चा आता निघणार नाही;पण..
ठाकरे हाच ब्रँड!
(फडणवीस यांनी घेतलेला शहाणपणाचा निर्णय.छान) pic.twitter.com/eTm1Rei41B— Sanjay Raut (@rautsanjay61) June 29, 2025
ठाकरे हाच ब्रँड!
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्सवरुन पोस्ट करत हा मराठी एकजुटीचा विजय असल्याचे म्हटले आहे. “हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द! हा मराठी एकजुटीचा विजय, ठाकरे एकत्र येणार याचा धसका, ५ जुलैचा एकत्रीत मोर्चा आता निघणार नाही; पण.. ठाकरे हाच ब्रँड! (फडणवीस यांनी घेतलेला शहाणपणाचा निर्णय.छान)” अस एक्सवरील पोस्टमध्ये संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच राऊतांनी आज ज्या जीआरची होळी करण्यात आली त्या होळीचा आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो पोस्टमध्ये दाखवले आहेत.





