Marathi News

जनतेला स्वस्त आणि जास्त वीज उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

Written by:Astha Sutar
Last Updated:
स्थानिक स्वराज्य संस्थाकडील वीजदेयकाच्या थकबाकी वसूलीची योजना,भविष्यकाळातील विजेची वाढती मागणी लक्षात घेता विज वितरण यंत्रणा सक्षम करणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
जनतेला स्वस्त आणि जास्त वीज उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
Devendra Fadnavis : दिवसागणिक वीजेचे दर वाढत आहे. त्यामुळं सामान्य लोकं मेटाकुटीला आले आहेत. लोकांना अधिकची वीज उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. दरम्यान, जनतेला स्वस्त दरात व जास्तीत जास्त वीज उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळं ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी ऊर्जा विभागाने कालबध्द नियोजन  करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

शासनाच्या योजनांची प्रभावी अमंलबजावणी व्हावी…

दरम्यान, ऊर्जा क्षेत्रात अत्यंत महत्वाची आणि गेमचेंजर असलेली मुख्यमंत्री सौर कृषी  वाहिनी योजना २.० ही डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करा. तसेच महाऊर्जा निर्मिती व पारेषण विभागातील प्रत्येक प्रकल्पाची कामे गती शक्ती योजनेच्या धर्तीवर विहित वेळेत पूर्ण करा. वीज गळती कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अमंलबजावणी करून वीज वापरासाठी जनजागृती करा, आणि आगामी काळात हरित ऊर्जा विकासावर भर देण्याची गरज असून वीज वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यावर भर द्यावा. असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

महाऊर्जा व महावितरण एकत्र काम करावे

हायड्रोजन परिसंस्थेच्या विकासासाठी धोरणातंर्गत करण्यात येणारे संशोधन व विकास प्रकल्प, कौशल्य विकास यावर देखील भर देण्यात यावा. तसेच आगामी काळात हरित ऊर्जा विकासावर भर देण्याची गरज आहे. वीज क्षेत्रात शाश्वत विकासाभिमुख योजनांची गरज आहे. मॉडेल सोलर व्हिलेजसाठी महाऊर्जा व महावितरण कंपनीने संयुक्तपणे काम करावे. तसेच पीएम सुर्यघर मोफत वीज योजनेमध्ये राज्यातील सर्व शासकीय इमारतींचे सौर ऊर्जेव्दारे विद्युतीकरण करण्यासाठी महाऊर्जाने योजनेतील सर्वेक्षण पूर्ण करून या कामाला गती द्यावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews