Marathi News

मे महिन्याचा लाडक्या बहिणीचा हप्ता लवकरच देणार, मंत्री अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?

Written by:Astha Sutar
Published:
काही लोकं या योजनेबाबत चुकीची माहिती पसरवत आहेत. ही योजना बंद होणार..., सरकार पैसे देणार नाही..., सरकारकडे पैसे नाहीत. पण लाडकी बहीण योजना कुठेही बंद होणार नाही. आणि मे महिन्याचा हफ्ता लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हावा, यासाठी सरकारचा प्रयत्न आहे, असे मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या.
मे महिन्याचा लाडक्या बहिणीचा हप्ता लवकरच देणार, मंत्री अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?

Aditi Tatkare – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील मे महिन्यातील हफ्ता जून महिना सुरु झाली तरी सुद्धा आला नाही. त्यामुळं मे आणि जून महिन्याचा हफ्ता एकत्र येणार का, असा सवाल लाडक्या बहिणींतून उपस्थित केला जात आहे. तर मे महिन्याच्या हफ्त्याकडे लाडक्या बहिणी आस लावून बसल्या आहेत. अशातच आता मे महिन्याचा हफ्त्याबाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी हफ्ता कधी येणार याबाबत मोठं भाष्य केलं आहे.

लाडकी बहीण योजना बंद होणार नाही…

लाडकी बहीण योजना कुठेही बंद होणार नाही, योजना चालूच राहणार आहे. चार महिन्यापूर्वीच शासकीय महिलांनी जो लाभ घेतला आहे. ते जानेवारी महिन्यातच सरकारच्या निदर्शनास आले होते. आणि तेव्हापासूनच त्यांचे पैसे बंद केले आहेत. पण काही लोकं या योजनेबाबत चुकीचा समज पसरवत आहेत. चुकीची माहिती देत आहेत, पण ही योजना बंद होणार नाही, असं तटकरे म्हणाल्या. दुसरीकडे राज्यातील अवकाळी पावसामुळे जे शेतकऱ्यांचे नुकसान झालं. त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल. याबाबत आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. त्यासोबतच अन्य विभागातील देखील चर्चा करण्यात आली.

मे महिन्याचा हफ्ता लवकरच खात्यात जमा होईल…

बीडमध्ये ऊसतोड महिलांनी गर्भपिशवी काढून टाकले आहे. त्याबाबत आम्ही चौकशी करत आहोत. अशी काय कारणे झाली? आणि त्यांना हा निर्णय का घ्यावा लागला? याबाबत तपासणी करून चौकशी करत आहोत. मे महिन्याचा पण लाडक्या बहिणीचा हप्ता लवकरच खात्यात जमा होईल. आणि जून महिन्याचा पण हफ्ता लवकर देण्याबाबत सरकार विचारधीन आहे. शक्ती कायद्याचा प्रस्ताव मध्यंतरी केंद्राकडे पाठवला होता. परंतु त्याच्यामध्ये काही आता आमचे गृहमंत्री त्यात काही कायदे किंवा काही त्रुटी असतील, तर त्या ऍड करून, तो पुन्हा केंद्र सरकारकडे पाठवणार आहे, असे मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews