राज्यात गेल्या २४ तासात सर्वांधिक पाऊस कुठे? २४ तासांमध्ये आपत्तीमुळं मृत्यू आणि जखमींचा आकडा किती?

Written by:Astha Sutar
Published:
गेल्या २४ तासात रायगड, रत्नागिरी आणि पुणे बाट येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. राज्यातील पुर परिस्थिती नियंत्रणात आहे. तसेच पुरात वाहून... खड्यात पडून... आणि नदीत वाहून गेलेल्यामुळं राज्यात गेल्या २४ तासांत तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्या आहेत.
राज्यात गेल्या २४ तासात सर्वांधिक पाऊस कुठे? २४ तासांमध्ये आपत्तीमुळं मृत्यू आणि जखमींचा आकडा किती?

Maharashtra Weather : पावसाबाबत एक मोठी व महत्वाची बातमी समोर येत आहे. विदर्भ वगळता राज्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. दरम्यान, गेल्या २४ तासात राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर राज्यात गेल्या २४ तासात रायगड, रत्नागिरी आणि पुणे बाट येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. राज्यातील पुर परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र पावसाच्या आपत्तीमुळं काही ठिकाणी नागरिक मृत्यूमुखी व जखमींच्या घटना घडल्या आहेत.

समुद्रात न जाण्याचा इशारा…

दरम्यान, राज्यात पुढील २४ तासात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट आणि सातारा घाट येथे ऑरेंज मलर्ट देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीला INCOIS तर्फे आज संध्याकाळी ०५.३० पासून दि. २५-०६-२०२५ रोजी ०८.३० पर्यंत उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच काही गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मागील २४ तासात सर्वाधिक पाऊस झालेले जिल्हे

  • पालघर ७३.३ मि. मी
  • सिंधुदुर्ग ३६.४ मि. मी
  • रत्नागिरी २५.८ मि. मी
  • ठाणे १४.३ मि. मी
  • कोल्हापूर १३.९ मि. मी

तसेच पुरात वाहून… खड्यात पडून… आणि नदीत वाहून गेलेल्यामुळं राज्यात गेल्या २४ तासांत तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्या आहेत.

मुंबईसह कोकणात पावसाचा अंदाज

दुसरीकडे मुंबई शहर आणि उपनगरांत जोरदार पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणातील रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मे महिन्यात जोरदार हजेरी लावल्यानंतर जूनच्या सुरुवातीला पावसाने काही दिवस विश्रांती घेतली होती. मात्र, आता हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोकणासाह मुंबईत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीला पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews