Marathi News

जुलैमध्ये 13 दिवस बँकांचे कामकाज बंद; बँकेची कामे लवकर पूर्ण करा!

Written by:Rohit Shinde
Published:
जुलै महिन्यात देशभरात एकूण 13 दिवस बँकांचे कामकाज होणार नाही. त्यामळे बँकेशी संबंधित काही काम करायचे असेल तर ते अगोदर करून घ्या.
जुलैमध्ये 13 दिवस बँकांचे कामकाज बंद; बँकेची कामे लवकर पूर्ण करा!

जुलै महिना बँका 13 दिवस बंद राहणार आहेत. यामुळे तुमची बँकेशी संबंधित अनेक कामे बंद राहू शकतात. जुलै 2025 मध्ये दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवारी मिळून देशातील बँका जवळपास 13 दिवस बंद असतील. खासगी आणि सरकारी अशा दोन्ही क्षेत्रातील बँका दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसर्‍या शनिवारी सुरू असतात. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, बँका सर्व सार्वजनिक सणांच्या दिवशी बंद राहतील. काही बँका स्थानिक सुट्यांच्या दिवशी बंद असतील. स्थानिक सुट्या जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार यांच्या समन्वयातून निश्चित होतात. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, देशातील बँका दर रविवारी बंद असतात. त्यामुळे बँकेशी संबंधित काही काम करायचे असेल तर अगोदर करून घ्या अथवा सुट्ट्यांच्या यादीवर नजर टाका.

देशभरातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी

या जुलैमध्ये एकूण 4 रविवार आणि दोन शनिवार (दुसरा आणि चौथा) बँका बंद असतील. या कारणामुळे या काळात एकूण सहा दिवस देशभरातली बँका बंद असतील. जुलै महिन्यात कोणत्या तारखेला रविवार आणि शनिवार आहेत, ते जाणून घेऊयात.

12 जुलै (शनिवार) –दुसरा शनिवार

26 जुलै (शनिवार) – चौथा शनिवार

सर्व रविवार – 6, 13, 20 आणि 27 जुलै

या राज्यात सुट्ट्यांचा मांडव

त्रिपुरा :

3 जुलै (गुरूवार) – खारची पूजा, बँक बंद असेल

19 जुलै (शनिवार) – केर पूजा, बँकेला ताळे

जम्मू आणि काश्मीर :

5 जुलै (शनिवार) – गुरु हरगोविंदजी यांची जयंती, बँकेला सुट्टी

मेघालय:

14 जुलै (सोमवार) – बेह देन्खलम निमित्ताने बँकेला सु्ट्टी

17 जुलै (गुरूवार) – उतिरोत सिंह यांची पुण्यतिथी, बँका बंद

उत्तराखंड :

16 जुलै (बुधवार) – हरेला निमित्त बँका बंद

सिक्किम:

28 जुलै (सोमवार) – द्रुकपा छे-जी सणानिमित्त बँका बंद

ऑनलाईन बँकिंग सेवा सुरु

सुट्टीच्या दिवशी ग्राहकांना बॅंकेच्या शाखेत जाऊन त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाईन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करता येईल. क्रेडिट, डेबिट कार्ड आणि युपीआयचा वापर करुन पेमेंट्स करता येणार आहेत.

बँकेतील कामे लवकर पूर्ण करा

जुलै महिन्यात विविध सण, सुट्टीचे दिवस आणि रविवार यामुळे बँकांना अनेक दिवस सुट्टी असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आर्थिक व्यवहारांची योजना आधीच करून ठेवणे आवश्यक आहे. चेक क्लिअरन्स, रोख रक्कम काढणे, पासबुक अपडेट, कर्ज व्यवहार किंवा इतर बँकिंग सेवा यासाठी योग्य वेळी कामे उरकून घ्या. खासकरून ज्या दिवशी सण आहेत त्या दिवशी काही शाखा बंद राहू शकतात. ऑनलाईन व्यवहार शक्य असले तरी काही बाबतीत प्रत्यक्ष बँकेत जाणे आवश्यक असते. त्यामुळे वेळेवर काम उरकून संभाव्य गैरसोयी टाळा. बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून सुट्टीचे वेळापत्रक तपासा.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews