आयटीआर फाईल करण्यासाठी शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2025 आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप आयटीआर फाईल केला नाही त्यांनी तातडीनं आयटीआर फाईल करणं आवस्यक आहे. 15 सप्टेंबरपर्यंत आयटीआर फाईल न केल्यास करदात्यांना 5000 रुपयांपर्यंत दंड द्यावा लागू शकतो. त्यामुळे आयटीआर फाईल करणेबाबत तातडीने पाऊल उचला. आयटीआरसाठी मुदतवाढ मिळण्यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
वेळेत आयटीआर भरा!
आयटीआर म्हणजेच इनकम टॅक्स रिटर्न भरणे प्रत्येक करदात्याची जबाबदारी आहे. आयटीआर भरल्याने आपले उत्पन्न आणि कराची योग्य नोंद सरकारकडे होते. त्यामुळे भविष्यात कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अडचणी टाळता येतात. बँकेतून कर्ज घेताना, व्हिसा मिळवताना किंवा मोठ्या गुंतवणुकीसाठी आयटीआर आवश्यक ठरतो. सरकारकडून मिळणाऱ्या विविध सवलती व रिफंडसाठीही आयटीआर महत्त्वाचा आहे. वेळेवर आयटीआर भरल्यास करदात्याची विश्वासार्हता वाढते. तसेच भविष्यातील आर्थिक नियोजन आणि संपत्तीची योग्य नोंद ठेवण्यासाठी आयटीआर उपयुक्त ठरतो. त्यामुळे प्रत्येक करदात्याने आयटीआर वेळेवर आणि प्रामाणिकपणे भरावा हेच योग्य आहे. परंतु हा आयटीआर भरताना काही महत्वपूर्ण बाबींचे पालन आपण करणे आवश्यक आहे.
दंडात्मक कारवाई होणार!
आयटीआर फाईल करण्यासाठी केवळ एक दिवस बाकी आहे. करदाते उद्यापर्यंत इन्कम टॅक्स विभागाच्या पोर्टलवर जाऊन अर्ज करु शकतात. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डानं करदात्यांना या वर्षी आर्थिक वर्ष 2024-25चा म्हणजेच असमेसमेंट इयर 2025-26 च्या इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठी मुदत 15 सप्टेंबरपर्यंत दिली होती. यापूर्वी आयटीआर फाईल करण्याची मुदत 31 जुलै पर्यंत असायची. यंदा आयटीआर फॉर्ममध्ये काही दुरुस्त्या केल्यानं मुदतवाढ देण्यात आली होती. आयटीआर फॉर्ममधील अपडेट, फायलिंग सिस्टीममधील आवश्यक बदल आणि TDS क्रेडिट रिफ्लेक्शनसाठी होणारा उशीर याबाबतचे बदल करण्यासाठी महत्त्वाचे बदल करण्यात आले होते.
आयटीआर विभागाकडून निश्चित केलेल्या तारखेपर्यंत आयटीआर फाईल करणं आवश्यक आहे. जर करदाते आयटीआर दिलेल्या वेळेत फाईल करण्यात अपयशी ठरले तर त्यांना इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 234F नुसार डेडलाईन नंतर रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांना ज्यांना कर द्यायचा आहे त्यांना दंड द्यावा लागेल. कमाल दंडाची रक्कम 5000 रुपये आहे.
वेळेत आयटीआर भरण्याचे भविष्यात अनेक फायदे
आयटीआर म्हणजेच इनकम टॅक्स रिटर्न भरणे प्रत्येक करदात्याची जबाबदारी आहे. आयटीआर भरल्याने आपले उत्पन्न आणि कराची योग्य नोंद सरकारकडे होते. त्यामुळे भविष्यात कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अडचणी टाळता येतात. बँकेतून कर्ज घेताना, व्हिसा मिळवताना किंवा मोठ्या गुंतवणुकीसाठी आयटीआर आवश्यक ठरतो. सरकारकडून मिळणाऱ्या विविध सवलती व रिफंडसाठीही आयटीआर महत्त्वाचा आहे. वेळेवर आयटीआर भरल्यास करदात्याची विश्वासार्हता वाढते. तसेच भविष्यातील आर्थिक नियोजन आणि संपत्तीची योग्य नोंद ठेवण्यासाठी आयटीआर उपयुक्त ठरतो. त्यामुळे प्रत्येक करदात्याने आयटीआर वेळेवर आणि प्रामाणिकपणे भरावा हेच योग्य आहे.






