BMC Election 2026 : मुंबई हे महाराष्ट्राचे शहर नाहीच; भाजप नेत्याच्या विधानाने खळबळ

Published:
के अण्णामलाई हे  तामिळनाडू भाजपचे मुख्य नेते आहेत. मुंबईतील दक्षिण भारतीय लोकांची मते भाजपकडे वळवण्यासाठी हे अन्नमलाई यांना पक्षाने मुंबईच्या प्रचारात उतरवलं होते. यावेळी प्रभाग क्रमांक 47 मध्ये प्रचार करताना अण्णामलाई यांनी मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा केला
BMC Election 2026 : मुंबई हे महाराष्ट्राचे शहर नाहीच; भाजप नेत्याच्या विधानाने खळबळ

BMC Election 2026 : एकीकडे मुंबई महापालिका निवडणुकीने चांगलीच रंगत आणलेली असताना दुसरीकडे मुंबई हे शहर महाराष्ट्राचे शहर नाहीच ते एक आंतरराष्ट्रीय शहर आहे असं विधान करून भाजप नेते के अण्णामलाई यांनी खळबळ उडवून दिली आहे. आधीच भाजप हा मराठी माणसाचा विरोधात असल्याचा आरोप ठाकरे बंधू करत आहे त्यातच अण्णामलाई यांच्या या विधानाने विरोधकांच्या हाती आहे ते कोलीत मिळाल आहे.

काय म्हणाले के अण्णामलाई ( BMC Election 2026)

के अण्णामलाई हे  तामिळनाडू भाजपचे मुख्य नेते आहेत. मुंबईतील दक्षिण भारतीय लोकांची मते भाजपकडे वळवण्यासाठी हे अन्नमलाई यांना पक्षाने मुंबईच्या प्रचारात उतरवलं होते. यावेळी प्रभाग क्रमांक 47 मध्ये प्रचार करताना अण्णामलाई यांनी मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा केला, तसेच  बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी अशी अकलेचे तारेही त्यांनी तोडले. मुंबई हि महाराष्ट्राचे शहर नाही, ते आंतरराष्ट्रीय शहर आहे असं अण्णामलाई म्हणाले. मुंबई महापालिकेचे बजेट 75 हजार कोटीं आहे. ही काही लहानसहान रक्कम नाही. चेन्नईचं बजेट 8 हजार कोटी रुपये आहे. तर बंगळुरूचं बजेट 19 हजार कोटी रुपये आहे ही आकडेवारी त्यांनी सांगितली. BMC Election 2026

मुंबईत यंदा ऐतिहासिक निवडणूक

के अण्णामलाई यांच्या विधानावर ठाकरे बंधू कोणत्या शब्दात समाचार घेतात ते पाहायला हवं. मुंबई महापालिका निवडणुकीत यंदा तिरंगी सामना बघायला मिळतोय. एकीकडे भाजप आणि शिंदे गट यांची महायुती, दुसरीकडे प्रथमच एकत्र आलेले ठाकरे बंधु आणि तिसरीकडे काँग्रेस- वंचीतची आघाडी अशी हाय व्होल्टेज लढाई मुंबईत आहे.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews