Marathi News

Mumbai Ahmedabad Bullet Train : 15 ऑगस्टला धावणार बुलेट ट्रेन!! सुरुवातीला गुजरातमध्येच धावणार

Published:
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन 15 ऑगस्ट 2017 रोजी सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात सुरत ते बिलिमोरा दरम्यान बुलेट ट्रेन धावेल
Mumbai Ahmedabad Bullet Train : 15 ऑगस्टला धावणार बुलेट ट्रेन!! सुरुवातीला गुजरातमध्येच धावणार

Mumbai Ahmedabad Bullet Train : मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन बाबत महत्त्वाची अपडेट समोर येते. खरंतर देशातील ही पहिली बुलेट ट्रेन असून देशवासीयांना या बुलेट ट्रेन बाबत उत्सुकता आहे .ही ट्रेन कधी धावणार ?? तिचा वेग कसा असेल याबाबत सर्वसामान्य जनतेला कौतुक आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर असून ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत नेमकी कधी येणार याबाबत आता खुद्द केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांनी माहिती दिली आहे.

कधीपासून सुरू होणार बुलेट ट्रेन (Mumbai Ahmedabad Bullet Train)

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन 15 ऑगस्ट 2017 रोजी सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात सुरत ते बिलिमोरा दरम्यान बुलेट ट्रेन धावेल.  त्यानंतर वापी ते सुरत हा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यावर वापी ते अहमदाबाद मार्ग सुरू होईल. हे सगळे मार्ग प्रवासी सेवेत आल्यावर ठाणे ते अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन धावेल. तर, सगळ्यात शेवटी मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू होईल. Mumbai Ahmedabad Bullet Train

एकदा का बुलेट ट्रेन प्रवाशांच्या सेवेत आली की मग मुंबई ते अहमदाबाद अंतर फक्त दोन तासात गाठता येणार आहे.  बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी बीकेसी आणि शिळफाटादरम्यानच्या २१ किमी लांबीचा बोगदा तयार करण्यात येत आहे. या बोगद्यापैकी ५ किमी लांबीचा बोगदा शिळफाटा आणि घणसोलीदरम्यान न्यू ऑस्ट्रियन टनलिंग मेथड (एनएटीएम) वापरून बांधला जात आहे, तर उर्वरित १६ किमी लांबीचा बोगदा टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) वापरून बांधला जात आहे. या बोगद्यात ठाणे खाडीखालील ७ किमी लांबीच्या भागाचाही समावेश आहे.

एकूण किती स्थानके

या बुलेट ट्रेन प्रकल्पाची एकूण लांबी ५०८ किमी असेल, ज्यामध्ये गुजरातमध्ये ३४८ किमी, महाराष्ट्रात १५६ किमी आणि दादरा आणि नगर हवेलीमध्ये ४ किमी अंतर असेल. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन मार्गावर एकूण १२ स्थानके असतील. यामध्ये साबरमती, अहमदाबाद, आनंद, वडोदरा, भरूच, सुरत, बिलीमोरा, वापी, बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई या स्थानकांचा समावेश आहे.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews