श्रीहरिकोटा येथून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने भारतीय नौदल आणि लष्कराच्या दळणवळण सुविधा अधिक सुधारण्यासाठी डिझाइन केलेला CMS-03 हा अत्याधुनिक दूरसंचार उपग्रह आज यशस्वीरित्या प्रक्षेपित केला आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या प्रक्षेपण तळावरून, आज सायंकाळी ५.२६ वाजता CMS-03 उपग्रह घेऊन LVM-3 (GSLV मार्क-3) रॉकेटने अवकाशात झेप घेतली. विविध टप्प्यांत विभागलेल्या रॉकेटने उपग्रहाला यशस्वीरित्या नियोजित भू-स्थिर कक्षेत स्थापित केले.
स्वदेशी बनावटीचा उपग्रह प्रक्षेपित
हा उपग्रह रविवार, 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:26 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या प्रक्षेपण पॅडवरुन प्रक्षेपित करण्यात आला. हा आत्मनिर्भर भारताचा एक नवीन उड्डाण आहे. याला इस्रोचं ‘बाहुबली’ रॉकेट असं म्हटलं गेलं आहे. हा उपग्रह भारतीय नौदलाच्या जहाजं, विमानं, पाणबुड्या आणि सागरी ऑपरेशन केंद्रांमध्ये जलद आणि सुरक्षित संवाद प्रदान करेल. हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात वजनदार संप्रेषण उपग्रह आहे, ज्याचं वजन सुमारे 4,400 किलोग्रॅम आहे. हा पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा उपग्रह आहे.
या उपग्रहाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हा सर्वात वजनदार उपग्रह आहे. त्याचं वजन 4,400 किलोग्रॅम आहे. हा उपग्रह हिंदी महासागराच्या मोठ्या भागात मजबूत सिग्नल प्रदान करेल आणि अधिक डेटा हस्तांतरित करेल. तो संप्रेषण उपकरणांनी सुसज्ज आहे. या उपग्रहामुळं सागरी सुरक्षा, देखरेख आणि नौदल नेटवर्क क्षमता आणखी मजबूत होतील.
इस्रोच्या मोहिमेचे उद्दीष्ट काय ?
या उपग्रहात विस्तारित मल्टी-बँड तंत्रज्ञानासह अनेक आधुनिक वैशिष्ट्ये आहेत. यामुळे भारतीय लष्कर आणि नौदलाची महत्त्वाची कामे अधिक मजबूत होतील. भारताच्या सागरी सीमांवर बारकाईने नजर ठेवण्यासाठी हा उपग्रह मदत करेल. युद्धनौका आणि विमानांमध्ये सुरक्षित आणि अखंड दूरसंचार सेवा सुधारण्यासाठी हा उपग्रह मदत करेल. इस्रोने आतापर्यंत देशाच्या दळणवळण सुविधेसाठी ४८ उपग्रह अवकाशात स्थापित केले आहेत. नवीन CMS-03 उपग्रहाचे यश देशाच्या संरक्षण आणि दूरसंचार क्षेत्रातील एक मैलाचा दगड मानला जात आहे.
Launch Day for #LVM3M5. India’s heavy-lift rocket launches #CMS03 today at 17:26 IST.
Youtube URL: https://t.co/gFKB0A1GJE
🗓️ 2 Nov 2025 (Sunday)
🕔 4:56 PM IST onwardsFor more Information Visithttps://t.co/yfpU5OTEc5 pic.twitter.com/NB46ZT1Pwb
— ISRO (@isro) November 2, 2025






