Marathi News

Big News: अमृतसर-सहरसा गरीब रथ ट्रेनला आग; पंजाबमधील सरहिंद रेल्वे स्थानकावरील घटना

Written by:Rohit Shinde
Published:
आज सकाळी पंजाबमधील सरहिंद रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी अमृतसर-सहरसा गरीब रथ एक्सप्रेसच्या एका डब्यात अचानक आग लागली. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली असल्याची सध्या माहिती समोर आली आहे.
Big News: अमृतसर-सहरसा गरीब रथ ट्रेनला आग; पंजाबमधील सरहिंद रेल्वे स्थानकावरील घटना

भारतीय रेल्वे ही प्रवाशांसाठी वरदान, सुरक्षित आणि किफायतशीर प्रवासासाठी रेल्वे ओळखली जाते. मात्र गेल्या काही वर्षात रेल्वेचे वाढलेले अपघात, आगीच्या घटना चिंता वाढवणाऱ्या आहेत. अशा संपूर्ण परिस्थितीत आज सकाळी पंजाबमध्ये एक धक्कादायक घटना घडली. आज सकाळी पंजाबमधील सरहिंद रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी अमृतसर-सहरसा गरीब रथ एक्सप्रेसच्या एका डब्यात अचानक आग लागली. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली असल्याची सध्या माहिती समोर आली आहे.

अमृतसर-सहरसा गरीब रथ ट्रेनला आग

पंजाबमधील सरहिंद रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी अमृतसर-सहरसा गरीब रथ एक्सप्रेसच्या एका डब्यात अचानक आग लागली असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, ही घटना सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. 19 क्रमांकाच्या डब्यात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली असल्याची सध्या माहिती समोर आली आहे.

ट्रेनला आग लागताच लोको पायलटने आपत्कालीन ब्रेक लावले आणि तात्काळ ट्रेन थांबवली. यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत प्रवाशांना सुरक्षितपणे इतर डब्यात हलवले आणि एका तासात आग आटोक्यात आणण्यात आली. या अपघातात कोणीही मृत्युमुखी पडले नाही. गोंधळात काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली.

रेल्वेचा प्रवास धोकादायक होतोय?

भारतात रेल्वेचे वाढते अपघात आणि आगीच्या घटना हा खरोखरच गंभीर आणि चिंताजनक विषय बनला आहे. देशभरात प्रवासासाठी सर्वाधिक वापरले जाणारे हे वाहतूक माध्यम आता प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहे. अनेक ठिकाणी रेल्वे डब्यांना लागलेल्या आगीच्या घटना, तांत्रिक बिघाड, सिग्नलिंग प्रणालीतील त्रुटी आणि मानवी निष्काळजीपणामुळे झालेल्या दुर्घटनांनी जनतेत भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.

रेल्वे प्रशासनाने अत्याधुनिक तंत्रज्ञान, आग नियंत्रण यंत्रणा, आणि सुरक्षाव्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज आहे. तसेच गाड्यांची नियमित तपासणी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि प्रवाशांना सुरक्षा नियमांची जाणीव करून देणे अत्यंत आवश्यक आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews