रेल्वेने प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी, भारतीय रेल्वे लवकरच ९ वेगवेगळ्या मार्गांवर ९ नवीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्या सुरू करणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी ही माहिती दिली. केंद्रीय मंत्र्यांनी या नवीन गाड्या कोणत्या ९ मार्गांवर धावतील याची माहिती दिली आहे.
या नवीन गाड्या पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, ओडिशा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू येथील कोट्यवधी सामान्य प्रवाशांना गाड्यांमध्ये किफायतशीर प्रवास तर देतीलच, शिवाय त्यांचा प्रवास सोयीस्कर आणि आरामदायीही होईल.
हे ही वाचा
या मार्गांवर धावणार गाड्या
-
गुवाहाटी (कामाख्या) – रोहतक अमृत भारत एक्सप्रेस
-
डिब्रुगढ – लखनौ (गोमती नगर) अमृत भारत एक्सप्रेस
-
न्यू जलपाईगुडी – नागरकोइल अमृत भारत एक्सप्रेस
-
न्यू जलपाईगुडी – तिरुचिरापल्ली अमृत भारत एक्सप्रेस
-
अलीपुरद्वार – एसएमव्हीटी बेंगळुरू अमृत भारत एक्सप्रेस
-
अलीपुरद्वार – मुंबई (पनवेल) अमृत भारत एक्सप्रेस
-
कोलकाता (संतरागाछी) – तांबरम अमृत भारत एक्सप्रेस
-
कोलकाता (हावडा) – आनंद विहार टर्मिनल अमृत भारत एक्सप्रेस
-
कोलकाता (सियालदह) – बनारस अमृत भारत एक्सप्रेस
अमृत भारत एक्सप्रेसमध्ये १००० किमी प्रवासाचे भाडे ५०० रुपये