Marathi News

चालू बसमध्ये ड्रायव्हरला हार्ट अटॅक, 60 प्रवासी आणि थरार…

Written by:Rohit Shinde
Published:
मध्यप्रदेशच्या आगर माळवामध्ये एका चालू बसमध्ये ड्रायव्हरला हार्ट अटॅक आला होता, बसमध्ये 60 प्रवाशांचा जीव...
चालू बसमध्ये ड्रायव्हरला हार्ट अटॅक, 60 प्रवासी आणि थरार…

आगवा, मध्यप्रदेश: मध्यप्रदेशच्या आगर माळवा जिल्ह्यातून बसच्या अपघातासंबंधी एक धक्कादायक आणि थरारक अशी घटना समोर
आली आहे. एका प्रवासी बसमधून 60 प्रवासी प्रवास करत होते. चालू बसमध्येच ड्रायव्हरला अचानक हार्ट अटॅक आला. बसवरचे नियंत्रण सुटले,
तरी प्रसंगावधान राखत ड्रायव्हरने 60 प्रवाशांचा प्राण वाचवलाय. चालकाला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला
मृत घोषित केले आहे.

बडोदहून शुजालपूरकडे जाणारी बस

बस ड्रायव्हर रईस खान 60 प्रवाशांनी भरलेली बस घेवून बडोदहून शुजालपूरकडे जात होते. यावेळी रस्त्यात त्यांनी अचानक छातीत वेदना जाणवू लागल्या,हार्टअटॅक आल्याच समजताच रईस खान यांनी मोठ्या शिथापीने अनियंत्रित बस आवरण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना ते शक्य झालं नाही. शेवटी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या विटा आणि दगडांच्या ढीगाऱ्याला ही बस धडकल्याने बस जागेवर थांबली. प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली होती.

ड्रायव्हरचा मृत्यू, प्रवासी वाचले

भयभीत झालेल्या प्रवाशांनी काही वेळाने ड्रायव्हरकडे पाहिल्यानंतर तो अचेतन अवस्थेत असल्याचे दिसून आले. त्यातील काही प्रवाशी अॅम्बूलन्सच्या मदतीनेत्याला दवाखान्यात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी संबंधित डॉक्टरचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याचं घोषित केले. मात्र शेवटपर्यंत आपलं कर्तव्य न सोडल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

मृत्यूपूर्वी ड्रायव्हरने प्रवाशांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला. बस अनियंत्रित झाल्याची जाणीव होताच रईस खान यांनी बस बाजूच्या ढीगाऱ्यावर ढकलली, असे काही प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी सांगितले आहे. शिवाय यावेळी अनियंत्रित बसच्या धडकमुळे दोन बाईकस्वारांना काही प्रमाणात जखम झाल्याची बाब समोर आली आहे. सुदैवाने दोन्ही दुचाकींवरील प्रवासी सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे. अलीकडच्या काळात देशभरात अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. परंतु चालंकाचे प्रसंगावधान आणि आपल्या कर्तव्याची असलेली जाणीव नेहमीच दिसून येते. मृताच्या कुटुंबाला काही सरकारी मदत मिळते का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे,

 

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews