Marathi News

सुखाने भाकरी खा, अन्यथा माझी गोळी तुमच्या निशाणावर असेल, भुजमधून पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा

Written by:Astha Sutar
Published:
ऑपरेशन सिंदूरमधून आपल्या जवानांची ताकद, लष्कराची क्षमता आणि शौर्य दिसून आले. आता पुन्हा अतिरेक्यांनी कुरापती केल्या तर आपले वीर जवान जशास तसे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत. 
सुखाने भाकरी खा, अन्यथा माझी गोळी तुमच्या निशाणावर असेल, भुजमधून पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. त्या दौऱ्यात त्यांनी अनेक विकास कामांचे लोकार्पण केले. तसेच नरेंद्र मोदी गुजरातमधील भूजमधील एका सभेला संबोधित करताना आतंकवाद आणि पाकिस्तानबाबत मोठं भाष्य केले आहे. आतंकवाद बाबत भारताने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. तसेच पाकिस्तानला एक स्पष्ट इशारा दिला आहे. तुम्ही सुखाची भाकरी खाऊन नीट रहा… अन्यथा माझ्या गोळीच्या निशाणा तुम्ही असाल, असा सूचक इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला दिला आहे.

भारत पर्यटनावर विश्वास ठेवतो…

दरम्यान, या सभेत पुढे बोलताना नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला. नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, भारत हा असा एक देश आहे, जो पर्यटनावरती विश्वास ठेवतो. पर्यटनामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते. ही एक शक्ती आहे, जी लोकांना एकत्र आणू शकते. परंतु पाकिस्तानसारखा देश आतंकवादला पोषतो, आणि आतंकवाच्या रूपामध्ये पर्यटन पाहत आहे. हा मुद्दा जागतिक पातळीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खूप धोकादायक आणि गंभीर असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी नमूद केले.

जवानांकडून जशाच तसे उत्तर…

पहलागाम येथे अतिरेक्यांनी हल्ला केला होता, यात 26 पर्यटकांचा मृत्यू गेला. मात्र या घटनेनंतर काही दिवसातच भारताने पाकिस्तान, पाकव्याप्त काश्मीर आणि अतिरेकी यांना जशास तसे उत्तर दिले. मी माझ्या जवानांना, सैन्य दलाला आणि लष्कराला पूर्ण स्वतंत्र दिले होते. तुम्ही जो निर्णय घ्याल, तो घ्या असे म्हटले होते. यानंतर आपल्या जवानांनी पूर्ण शक्तीने, सहसाने आणि धाडसाने अतिरेक्यांना अद्दल घडवली. आणि जशास तसे उत्तर दिले. या जवानांचा आम्हाला अभिमान आहे, असेही मोदींनी यावेळी सांगितले.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews