Marathi News

एलन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीला दूरसंचार खात्याची परवानगी, भारतातही आता हायस्पीड सॅटेलाईन इंटरनेट मिळणार

Written by:Smita Gangurde
Published:
स्टारलिंक उपग्रहामुळे हायस्पीड इंटरनेट मिळणं शक्य होणार असून अगदी ग्रामीण भागात जिथं सद्याच्या परिस्थितीत नेटवर्क मिळणं कठीण झालंय तेथेही इंटरनेट सेवा सहज उपलब्ध होऊ शकेल.
एलन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीला दूरसंचार खात्याची परवानगी, भारतातही आता हायस्पीड सॅटेलाईन इंटरनेट मिळणार

नवी दिल्ली-  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या वादामुळं सध्या चर्चेत असलेले उद्योगपती एलन मस्क यांच्या कंपनीच्या भारतातील प्रवेशाला परवानगी देण्यात आलीय. मस्क यांची कंपनी स्पेसएक्सला स्टारलिंक सॅटेलाईट इंटरनेट सेवा भारतात कार्यरत करण्यासाठी लायसन्स मिळालं आहे. केंद्राच्या दूरसंचार विभागानं हा निर्णय घेतलाय.

वनवेब आणि रिलायन्स जिओनंतर अशी परवानगी मिळवणारी स्टारलिंक ही तिसरी कंपनी आहे. आता फक्त स्टार लिंकला इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथरायझेशन सेंटरची परवानगी मिळणं बाकी आहे. स्टारलिंकला परवानगी मिळाल्यानंतर देशात 840 रुपयांत महिनाभर अनलिमिटेड डेटा स्टार लिंकच्या वतीनं देण्यात येणार आहे.

स्टारलिंकचा फायदा काय होणार?

स्टारलिंक उपग्रहाद्वारे हायस्पीड इंटरनेट डेटा देणार आहे. त्यामुळं ग्रामीण भागात, डोंगर-दऱ्यांसारख्या दुर्गम ठिकाणीही आता सहज इंटरनेट सेवा उपलब्ध होऊ शकेल. ऑनलाईन शिक्षण, टेलीमेडिसिन, व्यवसायांना यामुळं चालना मिळेल. टेलिकॉम मार्केटमध्ये स्पर्धा वाढल्यानं स्वस्त आणि चांगले प्लॅन मिळू शकतात.

मस्कसाठी भारत का महत्त्वाचा

भारत हे जगातील सव्रात मोठं इंटरनेट मार्केट आहे. मस्क यांच्यासाठी भारतात मिळालेलं लायसन्स हे मोठं यश मानण्यात येतंय. ट्रम्प यांच्याशी वाद झाल्यानंतर अ्मेरिकेतील स्पेस एक्स कंत्राट वादात असल्याचं सांगण्यात येतंय. अशात मस्क यांच्या कंपनीला भारतात प्रवेश मिळाल्यानं त्यांना याचा फायदाच होणार आहे.

Follow Us :GoogleNews