आपण जेव्हा एखादी वस्तू ऑनलाइन मागवतो, तेव्हा ती थेट आपल्या घरी पोहोचते. क्वचित प्रसंगी आपणाला डिलिव्हरीसाठी कुठे जावं लागलं, तरी लोक सार्वजनिक वाहतूक, दुचाकी किंवा कारचा वापर करतात. पण आज ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलणार आहोत, त्याने आपल्या एका वस्तूची डिलिव्हरी घेण्यासाठी थेट हेलिकॉप्टरचा वापर केला. इथे आपण अडाणी-अंबानीसारख्या अब्जाधीश व्यावसायिकांची नव्हे, तर केरळमधील एका उद्योजकाची गोष्ट सांगत आहोत.
पोलंड मूसा कोण आहे?
इथे आपण फ्रेग्रन्स वर्ल्डचे मालक पोलंड मूसा यांच्याबद्दल बोलत आहोत, जे केरळमधील रहिवासी आहेत. त्यांना मूसा हाजी म्हणूनही ओळखले जाते. त्यांची स्वतःची परफ्युम कंपनी आहे आणि तिचे 4,000 पेक्षा जास्त परफ्युम उत्पादन 132 देशांमध्ये विकले जातात.
या वर्षी मे महिन्यात मूसा यांनी आपल्या नवीन Bentley Bentayga EWB या लक्झरी SUV ची डिलिव्हरी घेण्यासाठी थेट हेलिकॉप्टरने आगमन केले. त्यांच्या कलेक्शनमध्ये Rolls Royce Cullinan, Range Rover Vogue, Mercedes G63 AMG, Lexus LX600 यांसारख्या अनेक महागड्या कार्स आहेत. यापैकी बहुतेक गाड्या दुबईमध्ये आहेत, कारण त्यांचा व्यवसाय मुख्यतः तिथे आहे.
&
Another beast joins the fleet. Our brand-new Bentley Bentayga Signature Edition has officially touched down in our hometown Edayur, Valanchery. Luxury, power, and presence this one makes a statement wherever it rolls.@BentleyMotors pic.twitter.com/Elu4AZGxei
— polandmoosa (@polandmoosa) May 28, 2025
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
हेलिकॉप्टरमधून बेंटलेची डिलिव्हरी घेण्यासाठी आलेल्या मूसा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. यात ते Range Rover, Land Rover Defender 110 आणि Toyota Land Cruiser या SUV गाड्यांच्या ताफ्यासोबत हेलिकॉप्टरने एका मोकळ्या मैदानी भागात येतात. तिथे नीळ्या कपड्याने झाकलेली Bentley Bentayga उघडून त्यावरचा कपडा काढतात. कपडा हटताच एक चमकदार Rose Gold शेडमधील Bentayga समोर येते.





