बंगळुरु – पहलगामध्ये भारतीय पर्यटकांवर भ्याड आतंकवादी हल्ला झाला होता. या हल्लाला भारतानं ठोस प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि दहशतवाद पोसणाऱ्या पाकड्यांच्या सीमेत घुसून दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली. पाकिस्ताननंही भारतावर पलटवार करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र, भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमसमोर पाकच्या शस्त्रांचा काही टिकाव लागला नाही. काही काळानंतर शस्त्रसंधी झाली.
या सगळ्यात प्रश्न होता तो कोणत्या देशाचं किती नुकसान झालं? भारताचं आम्ही फार मोठं नुकसान केलं असा पोकळ दावा पाकिस्तान सातत्यानं करत राहिला. मात्र, प्रथमच भारताचे वायुदल प्रमुख ए पी सिंग यांनी आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानी वायुदलातील सहा विमानं पाडल्याचा दावा केलाय.
बंगळुरूतील एका व्याख्यानात बोलताना वायुदल प्रमुखांनी ही माहिती दिलीय. याच व्यख्यानात बोलताना त्यांनी भारताची एअर डिफेन्स सिस्टीम S 400 गेम चेंजर ठरल्याचंही म्हटलंय. याच एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकड्यांची विमानं भारतीय सीमांपासून दूर राहिली…
गेमचेंजर S – 400
एस-400 एसएएम ही देखील हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र प्रणाली आहे. एअर डिफेन्स सिस्टिम म्हणजे शत्रूच्या हवाई हल्ल्यांपासून संरक्षण देणारी यंत्रणा आहे. शत्रूकडून येणारी विमान, ड्रोन, किंवा क्षेपणास्त्र हवेत दूरवर असतानाच टिपते
हे लांब पल्ल्याचे सरफेस टू एअर प्रकारचे सिस्टम आहे
हे सिस्टम स्वतः जमिनीवर तैनात असते. तिथूनच क्षेपणास्त्र डागून शत्रूचे रॉकेट-क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करते. एस-400 एसएएम रशियाच्या अल्माज सेंट्रल डिझाइन ब्युरोने 1980 च्या दशकात विकसित केले. हे 600 किमी पर्यंतच्या हवाई हल्ल्याचा मागोवा घेऊ शकते. एस-400 चार प्रकारच्या क्षेपणास्त्रांचा वापर करतं. जे 400 किमी पर्यंतच्या अंतरावर लक्ष्याला भेदण्यास सक्षम आहेतहे लढाऊ विमाने, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन रोखू शकते
कसं झालं ऑपरेशन सिंदूर यशस्वी ?
जवळपास तासाभराच्या या व्याख्यानात एअर चीफ मार्शल ए पी सिंग यांनी ऑपरेशन सिंदूर बाबत अतिशय महत्वाची माहिती दिलीय.
1. लक्ष्यांची अचूक निवडः केवळ दहशतवाद्यांचे लॉन्चपॅडच नव्हे, तर दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांना आणि त्यांच्या मुख्यालयांना लक्ष्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बहावलपूर आणि मुरिदके येथील दहशतवादी मुख्यालयांवर हल्ले करण्यात आले.
2. विविध यंत्रणांचा समन्वयः या ऑपरेशनमध्ये तिन्ही सैन्यदलांसह एकूण ८ विविध सुरक्षा यंत्रणांचा सहभाग होता आणि सर्वामध्ये उत्तम समन्वय होता.
3. S-400 प्रणाली ठरली ‘गेम चेंजर’: हवाई दल प्रमुखांनी नुकत्याच खरेदी केलेल्या S-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचे विशेष कौतुक केले. S 400 प्रणाली खऱ्या अर्थानं गेमचेंजर ठरली





