Thailand Tour – अनेक भारतीयांना परदेशात जायचे असते तेव्हा त्यांची पहिली पसंती थायलंड असते. पण जर तुम्ही थायलंडला जाण्याच विचारात असाल तर थांबा कारण भारतीय दूतावासाचे म्हणणे आहे की, देशात येणाऱ्या पर्यटकांनी सीमा सुरक्षेचा विचार करून थांयलंडमधील सात ठिकाणी जाण्याचे टाळावे. यासाठी भारताने दोन्ही देशांमधील प्रवासाची मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.
कंबोडियातील भारतीय दूतावासाचा सल्ला काय?
कंबोडियाची राजधानी फ्नोम पेन्हमधील भारतीय दूतावासाने लोकांना सीमावर्ती भागात प्रवास करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. आणि आपत्कालीन संपर्क क्रमांक देखील जारी केले आहेत. शुक्रवारी, थायलंडमधील भारतीय दूतावासाने असाच एक इशारा जारी केला आणि भारतीय प्रवाशांना युद्धक्षेत्राजवळ जाणे टाळण्यास सांगितले. दूतावासाने म्हटले आहे की, “थायलंड-कंबोडिया सीमेजवळील परिस्थिती पाहता, सर्व भारतीय नागरिकांनी सुरक्षित राहावे. असा सल्ला दिला आहे.
कोणत्या ७ ठिकाणी जाणे टाळावे…
१ सुरिन प्रांत (Surin Province) – कंबोडिया सीमेला लागून असलेला प्रदेश, जिथे पूर्वीही वाद झाले आहेत.
२ सीसा केट (Sisaket Province) – इथे प्रेह विहेयर मंदिराच्या आसपासचा भाग वादग्रस्त आहे.
३ उबोन राचथानी (Ubon Ratchathani) – कंबोडियाच्या सीमेलगत असलेले क्षेत्र, अलीकडे येथे लष्करी हालचाली दिसल्या आहेत.
४ बुरीराम (Buriram Province) – हे एक पर्यटनस्थळ असले तरी सीमेला लागून असल्यामुळे तणाव असू शकतो.
५ त्राट प्रांत (Trat Province) – थायलंडच्या पूर्वेकडील किनाऱ्यालगत, कंबोडिया सीमेजवळ आहे.
६ साकेओ प्रांत (Sa Kaeo Province) – हेही सीमेला लागून असलेले संवेदनशील क्षेत्र आहे.
७ चंथमबुरी प्रांत (Chanthaburi Province) – हे देखील कंबोडियाच्या सीमेपासून जवळ आहे आणि सध्या तणावात येऊ शकतो.





