बाबा वेंगा ज्यांचे खरे नाव वेंजेलिया पांडेवा गुश्टेरोवा होते, त्या त्यांच्या अचूक भविष्यवाण्यांसाठी प्रसिद्ध आहेत. बुल्गारियाचे प्रसिद्ध भविष्यवक्ता बाबा वेंगा यांच्या अनेक भविष्यवाणी जसे की 9/11 हल्ला, कोविड-19 महामारी आणि 2004 ची सुनामी यावर खरी ठरलेली आहे. चला जाणून घेऊया की 2025 साली त्यांच्या भविष्यवाण्या काय सांगतात आणि त्या सत्यात उतरल्या जाण्याच्या किती जवळ आहेत.
बाबा वेंगा यांची भविष्यवाणी
बाबा वेंगा यांनी २०२५ मध्ये आर्थिक अस्थिरता आणि नैसर्गिक आपत्तींची भविष्यवाणी केली होती. ज्यामध्ये तीव्र दुष्काळ, पूर, भूकंप आणि असामान्य तापमान वाढ यांचा समावेश आहे. अलिकडेच अफगाणिस्तानातील भूकंपात ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. रशियामध्ये तीव्र भूकंप झाला. त्याच वेळी मार्चमध्ये म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपात शेकडो लोकांचे प्राण गेले. याशिवाय, त्यांनी अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर ज्वालामुखीचा उद्रेक आणि भूकंपाचा इशारा दिला होता.
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची शक्यता
बाबा वेंगा यांनी २०२५ मध्ये मोठे युद्ध होण्याची शक्यता वर्तवली होती, परंतु त्यांना भीती होती की या वर्षी अनेक देशांमध्ये विनाश होऊ शकतो. जरी त्यांनी कोणत्याही देशाचे नाव घेतले नाही. परंतु याआधी केलेल्या अनेक भाकिते खऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळे, बाबा वेंगा यांच्या भाकितात भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाचाही उल्लेख असू शकतो असे मानले जात होते.
अमेरिकेतील आर्थिक आणि नैसर्गिक संकट
बाबा वेंगा यांनी २०२५ मध्ये आर्थिक गोंधळ आणि नैसर्गिक आपत्तींचा इशारा दिला होता. या वर्षी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांसोबत टॅरिफ वॉर सुरू केले आहे. ज्यामुळे आर्थिक जागतिक बाजारपेठेत विनाश ओढवू शकतो. हे पाऊल बाबा वेंगा यांचे आर्थिक संकटाचे भाकीत खरे ठरल्याचे दिसते. याशिवाय, त्यांनी अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर ज्वालामुखीचा उद्रेक आणि भूकंपाचा इशारा दिला होता. रशियातील कामचटका येथे नुकत्याच झालेल्या ८.८ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे अमेरिका आणि जपानच्या किनारी भागात त्सुनामीचा धोका वाढला.
जपानमध्ये त्सुनामीचा धोका
बाबा वेंगा यांनी जपानबद्दल केलेल्या भविष्यवाण्या आणि ‘जपानी बाबा वेंगा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जपानी संदेष्टा रियो तात्सुकी यांच्या भविष्यवाण्याही बातम्यांमध्ये आहेत. तात्सुकी यांनी २०२५ मध्ये जपानमध्ये मोठ्या त्सुनामीचा इशारा दिला होता, जो २०११ च्या तोहोकू आपत्तीपेक्षा तिप्पट धोकादायक असू शकतो.
भारतात नैसर्गिक आपत्ती
बाबा वेंगा यांचे भाकीत भारतातही खरे ठरताना दिसत आहे. अलिकडच्या काळात विक्रमी पाऊस, मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलन झाले आहे. त्यांनी २०२५ मध्ये तीव्र भूकंप आणि पूर येण्याचा इशारा दिला होता. पंजाबमध्ये गेल्या काही दशकांतील सर्वात मोठ्या पुरामुळे लाखो लोक प्रभावित झाले आहेत. नद्या दुथडी भरून वाहत आहेत, कालवे फुटले आहेत आणि हजारो हेक्टर शेती जमीन उद्ध्वस्त झाली आहे. उत्तराखंड, दिल्ली आणि हरियाणामध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत बाबा वेंगा यांचे भाकीत खरे ठरताना दिसत आहे असे म्हणता येईल.





