भारतीय संरक्षण क्षेत्रासाठी दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारसचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित हलका लढाऊ विमान (LCA) तेजस MK1-A ने शुक्रवारी यशस्वीरीत्या आपले पहिले उड्डाण केले. या उड्डाणामुळे भारतीय वायुसेनेला नवं बळ मिळालं आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) यांनी विकसित केलेल्या या अत्याधुनिक विमानामुळे देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल अधिक वेगवान झाली आहे. या घटनेची सध्या सर्वत्र नोंद घेतली जात आहे.
LCA तेजस MK 1A वायुसेनेच्या ताफ्यात दाखल
अत्याधुनिक लढाऊ तेजस लढाई विमानाचे आज उद्घाटन झाले आहे. पूर्ण भारतीय बनावटीचे तेजस विमान भारतीय हवाई दलात होणार दाखल झाले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सर्वात हलके लढाऊ विमान, ताशी 2000 किलोमीटर वेग आणि हवेतच इंधन भरण्याची क्षमता ही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. भारतीय हवाई दलासाठी आजचा दिवस गौरवाचा आहे. तेजस LCA Mk1A हे भारतात बनवलेले अत्याधुनिक हलके लढाऊ विमान आहे. ध्वनीच्या वेगाच्या 1.6 पट म्हणजेच सुमारे 2,000 किमी प्रतितास वेगाने उड्डाण करण्यास सक्षम असे हे विमान. 50,000 फूट उंचीपर्यंत सहज उड्डाणाची क्षमता या लढाऊ विमानात आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम, शत्रू धास्तावला!
सर्व दिशांनी लक्ष्य साधण्याची क्षमता असलेले लढाऊ विमान. AESA रडारमुळे एकाच वेळी अनेक लक्ष्य ओळखणे आणि ट्रॅक करणे शक्य. शत्रूच्या इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेपापासून सुरक्षित रडार प्रणाली या विमानात आहे. CIT प्रणालीमुळे “मित्र की शत्रू” अशी लक्ष्य ओळख त्वरित शक्य होते. SDR रेडिओमुळे सुरक्षित व सॅटेलाइटद्वारे संवाद साधण्याची सुविधा आहे. डिजिटल मॅप जनरेटरमुळे परिसर आणि उंचीची अचूक माहिती मिळते. EW Suite प्रणाली शत्रूच्या रडारला जॅम करून फसवण्याची क्षमता देते.
SMFD स्क्रीनवर मिशन डेटा, नकाशे आणि अलर्टची थेट माहिती उपलब्ध होते. हवेतच इंधन भरण्याची आधुनिक सोय उपलब्ध आहे. डेल्टा विंग डिझाइनमुळे उच्च वेग आणि चपळ उड्डाण क्षमता आहे. क्वाड्रप्लेक्स डिजिटल फ्लाइट कंट्रोलमुळे अचूक आणि स्थिर नियंत्रण प्रणाली आहे. आत्मनिर्भर भारताच्या वायुदलाची तांत्रिक ताकद दर्शवणारे प्रतिक आहे. 19 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने हवाई दलासाठी 97 तेजस लढाऊ विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली.
अनेक दिवसांचे स्वप्न अखेर सत्यात उतरले!
महाराष्ट्रातील नाशिक येथे तेजस MK1-A चे उड्डाण झाले. या वेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हेही उपस्थित होते. विमानाने यशस्वी उड्डाण केल्यानंतर त्याचे वॉटर कॅनन सलामीने स्वागत करण्यात आले. अनेक वर्षांपासून भारतीय वायुसेनेला या विमानाची प्रतीक्षा होती आणि अखेर आज तो क्षण सत्यात उतरला आहे.
LCA तेजस और HTT-40 Aircraft का निर्माण जो हो रहा है, वह भी हमारे देश के अलग-अलग industry partners के collaboration का परिणाम है। यह collaboration इस बात का प्रमाण है कि जब government, industries और academia मिलकर काम करते हैं, तो कोई भी चुनौती बड़ी नहीं रह जाती: रक्षा मंत्री श्री…
— रक्षा मंत्री कार्यालय/ RMO India (@DefenceMinIndia) October 17, 2025






