Nepal Protest : दिसताक्षणीस ‘त्या’ लोकांना गोळ्या घाला; सरकारचे थेट आदेश

Published:
नेपाळ सरकारने 4 सप्टेंबरला फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, वॉट्सऐप, रेडिट आणि X सारख्या 26 सोशल मीडिया ऐप्सवर बंदी घातली आहे. या बंदीचे मोठे पडसाद आज नेपाळ मध्ये पाहायला मिळाले.
Nepal Protest : दिसताक्षणीस ‘त्या’ लोकांना गोळ्या घाला; सरकारचे थेट आदेश

नेपाळ सरकारने अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्या नंतर देशातील तरुण संतप्त झाले. या तरुणांनी आज थेट संसद भवनात घुसण्याचा प्रयत्न (Nepal Protest) केला. सोशल मीडियाच्या बंदीमुळे शिक्षण आणि व्यवसाय प्रभावित होत आहे असे या तरुण आंदोलकांचे म्हणणं होते… आधीच नेपाळ मध्ये बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि आर्थिक मंदीवरून सरकार वर नाराजी आहे. त्यात आता सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद केल्याने खास करून युवकांमध्ये संताप उसळला. या आंदोलनात आतापर्यंत 20 तरुणांचा मृत्यू झाला आहे. तर 250 पेक्षा जास्त आंदोलक जखमी झाले आहेत. दरम्यान, सध्याची  परिस्थिती लक्षात घेता नेपाळ सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आंदोलकांना दिसत्या क्षणीच गोळ्या घाला असे थेट आदेश सरकारने सुरक्षा यंत्रणांना दिले आहेत.

नेपाळ सरकारने 4 सप्टेंबरला फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, वॉट्सऐप, रेडिट आणि X सारख्या 26 सोशल मीडिया ऐप्सवर बंदी घातली आहे. या बंदीचे मोठे पडसाद आज नेपाळ मध्ये पाहायला मिळाले. सोशल मीडियाच्या बंदीमुळे शिक्षण आणि व्यवसाय प्रभावित होत आहे असे या तरुण आंदोलकांचे म्हणणं आहे. आधीच नेपाळ मध्ये बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि आर्थिक मंदीवरून सरकार वर नाराजी आहे. त्यात आता सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद केल्याने खास करून युवकांमध्ये संताप उसळला. या बंदीविरोधात राजधानी काठमांडूसह अनेक शहरांमध्ये हजारो Gen-Z तरुणांनी हिंसक निदर्शने केली. (Nepal Protest) यादरम्यान शेकडो तरुण नेपाळच्या संसदेत घुसले.आंदोलकांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून आणि गेट ओलांडून न्यू बानेश्वर येथील संघीय संसद परिसरात घुसखोरी केली.

दिसता क्षणी गोळ्या घाला – Nepal Protest

आंदोलन आणि पोलीस यांच्यात मोठा संघर्ष बघायला मिळाला. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून लोकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. तरीही ही प्रकरण अधिक गंभीर होत असल्याचे पाहून हिंसक लोकांना दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काठमांडू प्रशासनाने हा आदेश जारी केला आहे. आतापर्यंत नेपाळ पोलिसांनी हिंसाचारात १४ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे.

काठमांडूमध्ये कर्फ्यू लागू –

काठमांडूमधील परिस्थिती लक्षात घेऊन पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपत्कालीन बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर काठमांडूमध्ये कडक कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. लोकांच्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर सैन्य सतर्क आहे. सुरक्षेच्या कारणास्तव, नेपाळचे राष्ट्रपती राम चंद्र पौडेल आणि पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या घरांवर सैन्य तैनात करण्यात आले आहे जेणेकरून कोणताही निदर्शक येथे पोहोचू नये.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews