पंतप्रधान मोदींकडून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणींच्या कुटुंबाचे सांत्वन

Written by:Rohit Shinde
Published:
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अहमदाबादमधील विमान दुर्घटना स्थळाची पाहणी केली. त्यानंतर मोदींनी निधन झालेले माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
पंतप्रधान मोदींकडून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणींच्या कुटुंबाचे सांत्वन

काल झालेल्या अहमदाबादमधील विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रुपाणी कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. विजय रूपणी यांची राजकीय कारकिर्द चांगलीच दखलपात्र राहिलेली होती. विजय रूपाणींच्या जाण्याने गुजरातने एक चांगला राजकारणी गमावल्याची भावना लोकांमधून व्यक्त केली जात आहे.

विजय रूपाणींची राजकीय कारकीर्द

विजय रुपाणी हे 2016 ते 2021 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री होते. ते गुजरातचे 16 वे मुख्यमंत्री होते. राजकोट वेस्ट मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. 2014 ते 2016 या कालावधीत ते कॅबिनेट मंत्री होते. 2006 ते 2012 या कालावधीत रुपाणी हे राज्यसभा सदस्य होते. 2016 मध्ये त्यांनी भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. 1996 ते 1997 मध्ये ते राजकोटचे महापौर होते.

रूपाणींचे प्रारंभिक आयुष्य

विजय रुपाणी यांचा जन्म 2 ऑगस्ट 1956 ला म्यानमारमधील येनगोनमध्ये झाला. 1960 त्यांचे कुटुंबीय राजकोटमध्ये आले. सौराष्ट्र विद्यापिठातून त्यांनी बीए आणि एलएलबीची पदवी घेतली. त्या दरम्यान ते अभाविपशी जोडले गेले. पुढे जनसंघ आणि आरएसएसशीही ते जोडले गेले. आणिबाणीच्या काळात त्यांनी 11 महिने तुरूंगवास भोगला.भाजपच्या महिला मोर्चाच्या सदस्या अंजली यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांचा एक मुलगा इंजिनीअर आहे. तर मुलीचा विवाह झाला आहे. एका मुलाचा कार अपघातात मृत्यू झाला.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews