Marathi News

पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये दाखल, जखमीची केली रुग्णालयात जाऊन विचारपूस, तातडीची बोलावली बैठक

Written by:Astha Sutar
Last Updated:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटना घडलेल्या ठिकाणाची पाहणी केल्यानंतर आणि रुग्णाची विचारपूस केल्यानंतर मोदींनी एक तातडीची बैठक बोलावली आहे. ही घटना नेमकी कशी घडली....
पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये दाखल, जखमीची केली रुग्णालयात जाऊन विचारपूस, तातडीची बोलावली बैठक

Ahmedabad Plane Crash : गुरुवारी अहमदाबादमध्ये विमान अपघाताची एक मोठी दुर्घटना घडली. एअर इंडियाचे AI 171 हे प्रवासी विमान टेक ऑफ केल्यानंतर लगेचच शहरातील मेघानीनगर परिसरात कोसळले. या विमानात 242 प्रवासी होते. त्यापैकी 241 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अजूनपर्यंत 269 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेनंतर सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

जखमीची केली रुग्णालयात जाऊन विचारपूस…

दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद येथे दाखल होत ज्या ठिकाणी दुर्घटना घडली तिथे घटनेची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी एकमेव देवाच्या कृपेने जो प्रवाशी बचावला आहे. त्या रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयात जाऊन मोदींनी त्या रुग्णाची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विचारपूस केली. नेमकी घटना कशी घडली… याच्याबाबत विचारपूस केली. यानंतर तातडीची बैठक बोलावण्यात आली असून, उपाययोजना आणि अन्य बाबीवर चर्चा करण्यात येत आहे.

तातडीची बैठक बोलावली…

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटना घडलेल्या ठिकाणाची पाहणी केल्यानंतर आणि रुग्णाची विचारपूस केल्यानंतर मोदींनी एक तातडीची बैठक बोलावली आहे. ही घटना नेमकी कशी घडली…. आणि रेस्को ऑपरेशन कशाप्रकारे करण्यात येत आहे … उपाययोजना काय केल्या पाहिजेत… याबाबत बैठकीत चर्चा केल्याची माहिती समोर येत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावरती मृत्यांना श्रद्धांजली वाहणारी एक ट्विट पोस्ट केले आहे. 

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews