Marathi News

रेल्वेचा चॅटबॉट नंबर जारी; अडचण आल्यास क्षणात करा तक्रार, नेमकी कुठे मिळतेय सुविधा?

Written by:Rohit Shinde
Published:
रेल्वे प्रवाशांना आता WhatsApp च्या माध्यमातून तक्रार नोंदवता येणार आहे. यामुळे समस्यांची सोडवणूक करणे अधिक जलद होणार आहे.
रेल्वेचा चॅटबॉट नंबर जारी; अडचण आल्यास क्षणात करा तक्रार, नेमकी कुठे मिळतेय सुविधा?

रेल्वे प्रवासादरम्यान कोणत्याही समस्येसाठी X, RailMadad आणि 139 असे हेल्पलाईन क्रमांक आहेत. आता ही सुविधा आणखी सोपी करण्याची तयारी करण्यात आली आहे. प्रवाशांना आता WhatsApp च्या माध्यमातून तक्रार नोंदवता येणार आहे. त्यामुळे वेगाने तक्रारींची सोडवणूक करणे शक्य होणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.

वेगाने तक्रार; तात्काळ सोल्युशन

रेल्वे प्रवासादरम्यान कोणत्याही समस्येसाठी X, RailMadad आणि 139 असे हेल्पलाईन क्रमांक आहेत. आता ही सुविधा आणखी सोपी करण्याची तयारी करण्यात आली आहे. प्रवाशांना आता WhatsApp च्या माध्यमातून तक्रार नोंदवता येणार आहे. रेल्वेने प्रवाशांसाठी RailMadad WhatsApp चॅटबॉट फीचर लाँच केले आहे. प्रवासी 7982139139 नंबरच्या माध्यमातून WhatsApp वर तक्रार नोंदवू शकतात. आरक्षित प्रवर्गातील प्रवासी तसेच जनरल तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही WhatsApp वर आपल्या तक्रारी नोंदविता येतील.

धनबाद रेल्वे विभागात सेवा सुरू

धनबाद रेल्वे डिव्हिजनने माहिती एक्सवर जारी केली आहे. असिस्टंट कमर्शियल मॅनेजरने आपल्या एक्स हँडलवर व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट नंबरही शेअर केला आहे. सर्व प्रवाशांना कळविण्यात आले आहे की, प्रवासादरम्यान कोणत्याही मदतीसाठी आपण RailMadad WhatsApp चॅटबॉटद्वारे तक्रार नोंदवू शकता. रेल्वेने रेल हेल्प नावाचा चॅटबॉट तयार केला आहे. त्यावर कोणताही प्रवासी हाय, हॅलो किंवा नमस्ते म्हणत आपली तक्रार नोंदवू शकतो. हाय, हॅलो किंवा नमस्ते टाइप करताच तुम्हाला “Namaste, Welcome to Rail Madad” असा संदेश मिळेल. राखीव तिकीटधारकांना PNR क्रमांक टाकून तक्रार दाखल करता येणार आहे.

अनारक्षित तिकीटधारकांच्या तक्रारीही नोंदविण्यात येणार आहेत. त्यांना तक्रारीसाठी जनरल तिकिटात दिलेला UTS क्रमांक टाकावा लागेल. नंबर टाकताच युजरला स्टेशनवर मिळणाऱ्या सेवेबाबत तक्रार करायची आहे का किंवा रेल्वे प्रवासादरम्यान काही अडचण आली आहे का, अशी विचारणा केली जाईल. ही प्रणाली प्रवाशांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews