ही दुर्घटना शब्दांपलीकडे आहे, सर्वजण हताश झालो आहोत, ही पोकळी न भरुन येणारी, पंतप्रधान नरेंद्र मोदीेची भावनिक पोस्ट

Written by:Astha Sutar
Last Updated:
अहमदाबादमधील हवाई दुर्घटनेने आपण सर्वजण हताश झालो आहोत. इतक्या अचानक आणि हृदयद्रावक पद्धतीने इतके जीव गमावणे शब्दांपलीकडे आहे. सर्व शोकाकुल कुटुंबांच्या प्रती आमच्या सहवेदना आहेत
ही दुर्घटना शब्दांपलीकडे आहे, सर्वजण हताश झालो आहोत, ही पोकळी न भरुन येणारी, पंतप्रधान नरेंद्र मोदीेची भावनिक पोस्ट

Ahmedabad Plane Crash : गुजरातमधील अहमदाबादमध्ये गुरुवारी विमान अपघाताची मोठी दुर्घटना घडली. एअर इंडियाचे AI 171 हे प्रवासी विमान टेक ऑफ केल्यानंतर लगेचच शहरातील मेघानीनगर परिसरात कोसळले. या विमानात 242 प्रवासी होते. त्यापैकी 241 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अजूनपर्यंत 269 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेनंतर सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये दाखल झालेत, तर त्यांनी एक भावनिक ट्विट केलं आहे.

शोकाकुल कुटुंबांच्या दु:खात आम्ही सहभागी…

दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद येथे दाखल होत ज्या ठिकाणी दुर्घटना घडली त्या घटनेची पाहणी केली. त्यानंतर रुग्णालयात जाऊन मोदींनी त्या रुग्णाची मोदींनी विचारपूस केली. यानंतर त्यांनी एक सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली आहे. “अहमदाबादमधील हवाई दुर्घटनेने आपण सर्वजण हताश झालो आहोत. इतक्या अचानक आणि हृदयद्रावक पद्धतीने इतके जीव गमावणे शब्दांपलीकडे आहे. सर्व शोकाकुल कुटुंबांच्या प्रती आमच्या सहवेदना आहेत. त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. आणि हे देखील माहित आहे की, ही पडलेली पोकळी येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत जाणवेल. ओम शांती.” असं मोदींनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

तातडीची उपाययोजना करा…

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटना घडलेल्या ठिकाणाची पाहणी केल्यानंतर आणि रुग्णाची विचारपूस केल्यानंतर मोदींनी एक तातडीची बैठक बोलावली आहे. ही घटना नेमकी कशी घडली…. आणि रेस्को ऑपरेशन कशाप्रकारे करण्यात येत आहे … उपाययोजना काय केल्या पाहिजेत… याबाबत बैठकीत चर्चा केल्याची माहिती समोर येत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर तत्काळ उपायोजना करा… आणि जखमींना मदत करा… असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्याची माहिती समोर येत आहे.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews