सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांच्या टार्गेटवर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत. ‘नितीन गडकरी यांचा पापाचा घडा भरला आहे.’ अशा शब्दांत अंजली दमानियांनी नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर अशा स्वरूपाचे आरोप केले आहेत. दमानियांच्या अनेक गंभीर अशा स्वरूपाच्या आरोपांमुळे या घटनेची राज्यभरात सध्या चर्चा सुरू आहे.
अंजली दमानियांचे गडकरींवर गंभीर आरोप
भांडूपमधल्या 600 कुटुंबांची घरे आणि त्यांची खालची जमीन असूनही ती जमीन एका शिरोडकर नावाच्या व्यक्तीस विकली गेली. भांडूपमधल्या 600 कुटूंबाची घरे आणि त्यांच्या खालची जमीन याची मालकी घरं असताना सुद्धा तिथल्या लॅंडलॅार्डने शिरोडकर नावाच्या व्यक्तीला ती जमीन विकली. इथेनॉल आणि रस्ते क्षेत्रात गडकरींशी संबंधित असंख्य कंपन्या असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय. टोलमधून जमा होणारा पैसा आयडीएल नावाच्या कंपनीच्या माध्यमातून थेट गडकरी यांच्या मुलांसाठी स्थापन केलेल्या कंपनीकडे वळवला गेला, असंही दमानिया यांनी म्हटलं आहे.
असीम गुप्ता यांना चुकीची ऑर्डर द्यायला भाग पाडलं, त्यांच्याविरोधात मी 11 पासून लढत आहे, असं देखील दमानिया यांनी स्पष्ट केलंय. प्रोजेक्ट नावाची कंपनी म्हैसकर नावाच्या कुटुंबाने बनवली आहे. या सगळ्या कंपन्यांना मुंबईच्या एन्ट्री पॉइंट्स तसेच नागपूर रिंग रोड बायपासची कामं मिळाली आहे. आता त्याचं कॅपिटल 750 कोटीपर्यंत गेलं आहे, 27 कोटींपासून त्यांनी सुरवात केली होती.निखिल नितीन गडकरी, हा या कंपनीसोबत असल्याचा आरोप देखील दमानिया यांनी केला आहे.
कंपनीवर 3188 कोटी रुपयांचे कर्ज होते. बेला नावाच्या गावात यांनी दोन वीज निर्मीती करण्याचे कारखाने सुरू केले. त्यापैकी एक सुरू झाला आणि आणि दुसरा बुडाला. मानस ॲग्रो कंपनी काढली जाणार होती. ती सारंग नितिन गडकरी यांची होती. यांनी लोन घेतले कंपनी बुडाली दाखवली. आणि पांढरा पैसा लुटला. हे पैसे गडकरी कुटुंबाला मिळाल्याचा दावा देखील दमानिया यांनी केला आहे.
8 कंपन्या आणि 278 गुंतवणूकदार, अशी मी सिरीज करणार आहे. प्रत्येक कंपनीत काय काय घडले सांगेन, असंही अंजली दमानिया यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. सारंग गडकरी यांनी कंपनी घेतली आणि ती कंपनी निखिलच्या कंपनीत घातली. त्यामुळे हे 29 अ चे उल्लंघन आहे. नितीन गडकरी आणि सारंग गडकरी यांनी ॲाफिस ॲाफ प्रॅाफीट केले आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहीजे. लोकांच्या डोक्यावर टोल थोपले. आयपीसी कायद्या अंतर्गत त्यांना जेल पाहीजे.
दमानियांची मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी?
128 कंपन्यांची डिटेल काढले आहे, वर्षभर चालेल इतकी सीरीज होईल. नितीन गडकरी यांचा पापाचा घडा भरला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत. ईडीने मला समन्स पाठवावे, मला हे सगळे कागदपत्रं त्यांना द्यायचे आहेत, अशी विनंती अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. त्यामुळे आता आगामी काळात या प्रकरणात नेमकं काय घडतं, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. शिवाय गेल्या अनेक दिवसांपासून नितीन गडकरींमुळे मुलगा सारंग गडकरीचा नेमका कसा फायदा होतो, या मुद्द्याची चर्चा देखील जनमानसात सुरू होती.






